Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 3:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जीएली हे कोहाथी कुळाचे होते; ही कोहाथची कुळे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 3:27
9 Iomraidhean Croise  

कहाथाचे पुत्र अम्रान, इसहार, हेब्रोन व उज्जीएल असे चार;


अम्रामी, इसहारी, हेब्रोनी, उज्जीएली ह्यांपैकी काही होते,


हेब्रोन्यांपैकी हशब्या व त्याचे भाऊबंद एक हजार सातशे हे वीर असून ते यार्देनेच्या पश्‍चिमेस परमेश्वराच्या सर्व सेवेसंबंधाने व राज्याच्या कामगिरीसंबंधाने इस्राएलावर देखरेख करणारे होते.


तो मला म्हणाला, ही दक्षिणाभिमुख असलेली खोली ह्या मंदिराचे रक्षण करणार्‍या याजकांसाठी आहे.


कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.


निवासमंडप आणि वेदी ह्यांच्या सभोवती असलेल्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा आणि त्यातील सर्व सामानासाठी लागणारे तणावे.


त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते ते आठ हजार सहाशे भरले; पवित्रस्थानाचे रक्षण करण्याची कामगिरी त्यांच्याकडे असे.


“लेव्यांच्या मुलांपैकी कहाथवंशजांची, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती कर;


बाकीच्या कहाथी वंशजांना एफ्राईम वंशातील कुळांच्या वाट्यांतून, दान वंशाच्या वाट्यांतून आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यांतून दहा नगरे चिठ्ठ्या टाकून दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan