Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 “लेवी वंशातील जितके पुरुष एक महिन्याचे अथवा त्याहून अधिक वयाचे असतील त्यांच्या वाडवडिलांची घराणी व त्यांची कुळे ह्यांना अनुसरून त्यांची गणती कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 “लेवी वंशातील जितके पुरुष व एक महिन्याचे किंवा त्याहून अधिक वयाची मुले असतील त्यांची, त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “आता तू लेवींची त्यांच्या घराण्यानुसार व कुळानुसार गणती करावी. एक महिन्याच्या व त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषाची गणती करावी.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 3:15
17 Iomraidhean Croise  

त्याप्रमाणे ज्या याजकांची त्यांच्या पितृकुळांप्रमाणे वंशावळीत नोंद झाली होती त्यांना आणि जे लेवी वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून आपापल्या क्रमानुसार काम करीत असत त्यांनाही वाटणी देत असत.


माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते; जे मला परिश्रमाने शोधतात त्यांना मी सापडते.


“जा, हे पुकारून यरुशलेमेच्या कानी पाड : परमेश्वर असे म्हणतो की, तुझे तारुण्यातले प्रेम, वाङ्निश्‍चयाच्या वेळचा तुझा अनुराग व रानात पडीत स्थळी तुझे माझ्यामागून येणे ह्यांचे मला स्मरण आहे.


परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले; तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे.


वीस वर्षांचे किंवा त्यांहून अधिक वयाचे जितके इस्राएल पुरुष युद्धास लायक असतील त्या सर्वांची त्यांच्या-त्यांच्या दलाप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा.


परंतु लेव्यांची इतरांबरोबर त्यांच्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे नोंद करण्यात आली नाही.


लेव्यांपैकी ज्यांची गणती त्यांच्या कुळांप्रमाणे झाली ते हे : गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ; कहाथाचे कहाथी कूळ व मरारीचे मरारी कूळ.


लेव्यांपैकी एक महिन्याच्या व त्यापेक्षा अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली, ते तेवीस हजार भरले; इस्राएल लोकांबरोबर त्यांची गणती केली नव्हती; कारण त्यांना इस्राएल लोकांबरोबर वतन दिले नव्हते.


मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याला झालेल्या आज्ञेनुसार त्यांची गणती केली.


त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांची संख्या सात हजार पाचशे भरली.


त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते ते आठ हजार सहाशे भरले; पवित्रस्थानाचे रक्षण करण्याची कामगिरी त्यांच्याकडे असे.


त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांची संख्या सहा हजार दोनशे भरली.


प्रथमजन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे पुरुष होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांच्या नावांच्या अनुक्रमाने त्यांची संख्या बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर भरली.


ते पाहून येशूला फार वाईट वाटले; आणि तो त्यांना म्हणाला, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.


त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan