Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 3:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 कारण प्रथमजन्मलेले सर्व माझेच आहेत; ज्या दिवशी मिसर देशातील प्रथमजन्मलेले सर्व मी मारून टाकले त्याच दिवशी इस्राएल लोकांतील मनुष्यांपैकी आणि पशूंपैकी प्रथमजन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरवले; ते माझेच आहेत; मी परमेश्वर आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 “सर्व प्रथम जन्मलेले माझेच आहेत. मी मिसर देशात सर्व प्रथम जन्मलेल्यांना मारून टाकले. त्याच दिवशी इस्राएल लोकांतील पुरुषांपैकी व पशूपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरवले. ते माझेच आहेत. मी परमेश्वर आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 कारण सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. ज्या दिवशी इजिप्तमध्ये मी सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, त्या दिवशी इस्राएलातील प्रत्येक प्रथम जन्मलेले मी माझ्यासाठी समर्पित करून घेतले, ते मनुष्य असो किंवा पशू, ते माझे आहेत, मीच याहवेह आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 3:13
16 Iomraidhean Croise  

आणि नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आपले प्रथमजन्मलेले पुत्र, तसेच आपल्या गुराढोरांचे व शेरडामेंढरांचे प्रथमजन्मलेले हे सर्व आमच्या देवाच्या मंदिरात सेवा करणार्‍या याजकांकडे घेऊन यावे;


तेव्हा उदरातून निघालेला प्रथमपुरुष आणि जनावरांच्या पोटचा प्रथमवत्स ह्यांना परमेश्वरासाठी वेगळे करावे. हे सर्व नर परमेश्वराचे आहेत.


आणि फारो आम्हांला जाऊ देईना; तेव्हा परमेश्वराने मिसर देशातील मनुष्य व पशू ह्यांचे सर्व प्रथमनर मारून टाकले; म्हणून उदरातून निघालेल्या सर्व प्रथमनरांचा मी परमेश्वराला बली अर्पण करतो; पण माझ्या मुलांतील ज्येष्ठ मुलाला मोबदला देऊन सोडवून घेतो.’


“इस्राएल लोकांमध्ये मनुष्य व पशू ह्या दोहोंच्या प्रथमजन्मलेल्या म्हणजे उदरातून प्रथम बाहेर आलेल्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव; ते माझे आहेत.” बेखमीर भाकरीचा सण


आपल्या शेताचा उपज व आपल्या फळांचे रस मला अर्पण करण्याची हयगय करू नकोस. तुझ्या मुलांपैकी प्रथमजन्मलेला मला द्यावा.


प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तुझ्या गुराढोरांपैकी गाईंचे व मेंढरांचे प्रत्येक प्रथमनरवत्स माझे आहेत.


सर्व प्रथमफळांचा प्रथमभाग, समर्पित अंश म्हणून अर्पण करायची प्रत्येक वस्तू याजकांची व्हावी; तुम्ही तिंबलेल्या कणकेचा पहिला गोळा याजकांना द्यावा म्हणजे तुमच्या घराला बरकत येईल.


ग्रामपशूंपैकी प्रथमवत्स परमेश्वराचा ठरलेला आहेच. त्याला कोणाला पवित्र करून वाहता येणार नाही; तो गुराढोरांपैकी असो किंवा शेरडामेंढरांपैकी असो, तो परमेश्वराचाच आहे.


उदरातून प्रथमजन्मलेले सर्व प्राणी, मग ते मानव असोत की पशू असोत, जे परमेश्वराला अर्पायचे ते सर्व तुझे होत; पण प्रथमजन्मलेले मानव अवश्य खंड घेऊन सोडून द्यावेत आणि प्रथमजन्मलेले अशुद्ध पशू खंड घेऊन सोडून द्यावेत.


मी स्वत: तुमच्या लेवी बांधवांना इस्राएल लोकांमधून घेतले आहे; दर्शनमंडपाची सेवा करण्यासाठी परमेश्वराला ते वाहिलेले असून मी तुम्हांला दान म्हणून ते दिले आहेत;


इस्राएल लोकांच्या सर्व प्रथमजन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी वंश माझ्यासाठी घे; मी परमेश्वर आहे; आणि इस्राएल लोकांच्या पशूंच्या सर्व प्रथमवत्सांच्या ऐवजी लेव्यांचे पशू घे.”


त्या वेळी मिसरी लोक परमेश्वराने ठार केलेल्या आपल्या ज्येष्ठ पुत्रांना मूठमाती देत होते; त्यांच्या देवांनाही परमेश्वराने शासन केले होते.


(म्हणजे ‘प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा,’ असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे,)


स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan