Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची नेमणूक कर म्हणजे ते आपले याजकपण सांभाळतील; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 “अहरोन व त्याचे पुत्र यांची याजक म्हणून नेमणूक कर. त्यांनी याजक म्हणून आपले सेवेचे काम करावे. कोणी परका जवळ आल्यास त्यास जिवे मारावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 याजकाची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याच्या पुत्रांची नेमणूक करावी. इतर दुसरे कोणी पवित्रस्थानाच्या जवळ आले, तर त्यास जिवे मारावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 3:10
25 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला; त्याच्या ह्या चुकीमुळे परमेश्वराने त्याला ताडन केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशाजवळ गतप्राण झाला.


त्याने उच्च स्थानी मंदिरे बांधली, आणि सर्व लोकांतून याजक नेमले; ते लेवीचे वंशज नव्हते.


यरुशलेमेत शलमोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शनमंडपाच्या निवासमंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत.


मी म्हणालो, “माझ्यासारख्या माणसाने पळून जावे काय? मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे? मी मंदिरात जाणारच नाही.”


आणि अहरोनाला व त्याच्या मुलांना कमरबंद बांध. त्यांच्या डोक्यांना फेटे बांध; ह्या प्रकारे ह्या निरंतरच्या विधीने त्यांना याजकपद प्राप्त व्हावे. ह्या प्रकारे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यावर संस्कार करावा.


तुम्ही माझ्या पवित्र वस्तूंची राखण केली नाही, तर तुम्ही माझ्या पवित्रस्थानात आपल्याऐवजी त्यांना माझ्या पवित्र वस्तूंचे राखणदार नेमले.


कोणा परक्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत; याजकाचा पाहुणा किंवा मजूर ह्यानेही पवित्र पदार्थ खाऊ नयेत.


निवासमंडप पुढे न्यायचा असेल तेव्हा लेव्यांनीच तो मोडावा; आणि तो उभा करताना लेव्यांनीच तो उभा करावा; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.


तुला व तुझ्या सर्व लेवीय भाऊबंदांना परमेश्वराने आपल्याजवळ घेतले असले तरी याजकपदही तुम्ही मिळवू पाहता काय?


मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणार्‍या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले.


ह्याचा हेतू असा की, अहरोन वंशाचा नसलेल्या कोणा परक्याने परमेश्वरासमोर धूप जाळण्यास जाऊ नये ह्याचे स्मरण इस्राएल लोकांना राहावे; आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे एलाजाराला सांगितल्याप्रमाणे कोरहाची व त्याच्या साथीदारांची झाली तशी गत कोणाचीही होऊ नये.


तुझ्यावर सोपवलेली आणि तंबूसंबंधीची सर्व कर्तव्ये त्यांनी करावी, पण पवित्रस्थानाच्या पात्रांजवळ व वेदीजवळ त्यांनी येऊ नये, आले तर ते व तुम्हीही मराल.


पण वेदीच्या संबंधात किंवा अंतरपटाच्या आतील सेवेच्या बाबतीत तू व तुझे मुलगे ह्यांनी आपले याजकपण सांभाळावे; तुम्ही सेवा करावी, कारण मी तुम्हांला दान म्हणून याजकपणाची ही सेवा दिली आहे; कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे.”


परमेश्वराने मोशेला सांगितले की,


निवासमंडपासमोर पूर्वेकडे म्हणजे दर्शनमंडपासमोर उगवतीस जे डेरे ठोकायचे ते मोशे आणि अहरोन व त्यांचे मुलगे ह्यांचे असावेत; इस्राएल लोकांकरिता पवित्रस्थानाच्या रक्षणाची जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली होती, ती त्यांनी पार पाडावी; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.


सेवा करताना सेवेत तत्पर असावे, शिकवणार्‍याने शिक्षण देण्यात,


तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाहीत; पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात;


कारण त्याने व त्याच्या वंशजांनी निरंतर परमेश्वराच्या नावाने सेवा करण्यास हजर राहावे म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुझ्या सर्व वंशांतून निवडून घेतले आहे.


तो पृथ्वीवर असता तर तो याजकच नसता; कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत.


ह्या मीखाचे एक देवघर होते. त्याने एक एफोद आणि काही तेराफीम (कुलदेवतेची मूर्ती) तयार केल्या व आपल्या एका मुलाला दीक्षा देऊन आपला पुरोहित नेमले.


बेथ-शेमेश येथल्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला; त्याने त्या लोकांतले पन्नास हजार सत्तर पुरुष जिवे मारले; परमेश्वराने माणसांचा एवढा संहार केला म्हणून त्या लोकांनी शोक केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan