Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 29:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 तुमचे नवस व स्वखुशीची अर्पणे ह्यांखेरीज नेमलेल्या सणात हे होमबली, अन्नार्पणे, पेयार्पणे आणि शांत्यर्पणे परमेश्वराला अर्पावीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 तुमचे नवस व स्वखुशीचे या व्यतिरिक्त नेमलेल्या सणात हे होमार्पण व पेयार्पण ही नवस व शांत्यर्पणे परमेश्वरास अर्पावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 “ ‘तुमचे नवस व तुमची स्वखुशीची अर्पणे याबरोबरच तुमची होमार्पणे, धान्यार्पणे, पेयार्पणे व शांत्यर्पणे तुमच्या नेमलेल्या सणाच्या वेळी याहवेहस अर्पण करावे.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 29:39
20 Iomraidhean Croise  

तसेच शब्बाथाच्या व चंद्रदर्शनाच्या दिवशी व नेमलेल्या पर्वणीस ठरवलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरासमोर उभे राहून सर्व होमबली त्यांना त्यास अर्पावे लागत.


परमेश्वराला केलेली अर्पणे व परमपवित्र वस्तू ह्यांची वाटणी करता यावी म्हणून इम्ना लेवी ह्याचा पुत्र कोरे जो पूर्ववेशीचा द्वारपाल होता त्याला स्वेच्छार्पणांची देखरेख करण्यासाठी नेमले होते.


मग त्याने आपल्या संपत्तीतून होमार्पणासाठी राजभाग ठरवला; परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे नित्य सकाळची व संध्याकाळची होमार्पणे, शब्बाथ, चंद्रदर्शने व नियतपर्वे ह्यांच्या होमबलींसाठी त्याने राजभाग ठरवला.


त्याप्रमाणेच त्यांनी पवित्र लेखात सांगितल्याप्रमाणे मांडवांचा सण पाळला आणि दररोज प्रयोजन पडेल तेवढे रोजचे होमबली नियमानुसार अर्पण केले.


नंतर रोजचे होमबली, चंद्रदर्शनाचे व परमेश्वराने पवित्र केलेल्या सर्व नेमलेल्या सणांचे बली आणि कोणी परमेश्वराला दिलेला स्वसंतोषाचा बली हे सर्व अर्पण केले.


समर्पित भाकरी, नित्याचे अन्नार्पण, नित्याचे होमार्पण आणि शब्बाथ, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण ह्यासंबंधाची बलिदाने आणि पवित्र वस्तू, इस्राएलाच्या प्रायश्‍चित्तासाठी पापार्पणे, ह्या सर्वांसाठी आमच्या देवाच्या मंदिराच्या कामी लागणारा खर्च आम्ही द्यावा.


माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण ह्यांचा द्वेष करतो; त्यांचा मला भार झाला आहे; तो सोसून मी थकलो आहे.


“इस्राएल लोकांना सांग, पवित्र मेळे भरवण्यासाठी परमेश्वराचे जे नेमलेले समय तुम्ही जाहीर करायचे ते माझे नेमलेले समय असे :


त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये, कारण हा प्रायश्‍चित्ताचा दिवस होय; त्या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त करण्यात येईल.


ह्याशिवाय तुम्ही परमेश्वराचे शब्बाथ पाळावेत, भेटी अर्पाव्यात, सर्व नवस फेडावेत आणि परमेश्वराला स्वसंतोषाची सर्व अर्पणे करावीत.


परमेश्वराप्रीत्यर्थ कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करायचा असेल तर त्याचा विधी असा :


तुम्ही मला होम व अन्नार्पणे अर्पण केली तरी त्यांत मला काही संतोष नाही; तुमच्या पुष्ट पशूंच्या शांत्यर्पणाकडे मी ढुंकून पाहणार नाही.


“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, माझे अर्पण म्हणजे माझे सुवासिक हव्यान्न तुम्ही माझ्याप्रीत्यर्थ नियमित समयी अर्पण करण्यास जपा.


नित्य होमार्पण व त्यांबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पण ह्यांखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.


परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्याने सर्वकाही इस्राएल लोकांना कळवले.


नाजीराचा नवस आणि आपणास परमेश्वराप्रीत्यर्थ जे अर्पण अर्पायचे त्याविषयीचा नियम हा. ह्याखेरीज त्याने ऐपतीप्रमाणे शक्य असेल ते द्यावे; केलेल्या नवसाप्रमाणे वाहून घेण्याच्या नियमाला अनुसरून त्याने वागावे.”


म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.


आणि तेथेच तुम्ही आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करायची अर्पणे, नवसाची अर्पणे, स्वसंतोषाची अर्पणे आणि आपल्या गुराढोरांचे व शेरडामेंढरांचे प्रथमवत्स आणावेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan