Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 29:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 दुसर्‍या दिवशी बारा गोर्‍हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 दुसऱ्या दिवशी तुम्ही बारा गोऱ्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाचे चौदा कोकरे अर्पण करावेत. ती दोषरहित असावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “ ‘दुसर्‍या दिवशी, बारा तरुण गोर्‍हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावे व हे सर्व निर्दोष असावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 29:17
14 Iomraidhean Croise  

यज्ञपशू व अन्नार्पण ह्यांत तुला संतोष नाही; तू माझे कान उघडले2 आहेस; होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस.


ते बैलांपेक्षा, शिंगे असलेल्या व दुभागलेल्या खुरांच्या गोर्‍ह्यापेक्षा परमेश्वराला आवडेल.


कोकरू घ्यायचे ते निर्दोष असावे. तो एक वर्षाचा नर असावा; हा नर मेंढरांतला किंवा शेरडांतला, तुम्हांला वाटेल तो घ्यावा;


“परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबली माझ्या काय कामाचे? मेंढरांचे होम, पुष्ट वासरांची चरबी ह्यांनी माझी अति तृप्ती झाली आहे; बैल, कोकरे व बोकड ह्यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही.


मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे; होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते.


सात दिवस परमेश्वराला हव्य अर्पावे व आठव्या दिवशी आपला पवित्र मेळा भरवून परमेश्वराला हव्य अर्पावे; सणाचा हा समारोपदिन होय. त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये.


परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते हे : तेरा गोर्‍हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा कोकरे; ही दोषहीन असावीत.


म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.


त्याने ‘नवा’ असे म्हटल्यावर पहिल्या कराराला जुना असे ठरवले आहे; आणि जे जुने व जीर्ण होत आहे, ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan