Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 29:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये, आणि परमेश्वराप्रीत्यर्थ सात दिवस सण पाळावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेहि अंगमेहनतीचे काम करू नये आणि परमेश्वरासाठी सात दिवस सण साजरा करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “ ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी पवित्र सभा बोलवा आणि त्या दिवशी कोणतीही नियमित कामे करू नये. हा सण तुम्ही याहवेहसाठी सात दिवस पाळावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 29:12
16 Iomraidhean Croise  

मग यराबामाने आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी यहूदातील सणासारखा एक सण केला आणि वेदीवर होमबली अर्पण केले; त्याप्रमाणे त्याने बेथेल येथे आपण केलेल्या वासरांप्रीत्यर्थ यज्ञ केले, आणि आपण केलेल्या उच्च स्थानांच्या याजकांना बेथेल येथे ठेवले.


त्याप्रमाणेच त्यांनी पवित्र लेखात सांगितल्याप्रमाणे मांडवांचा सण पाळला आणि दररोज प्रयोजन पडेल तेवढे रोजचे होमबली नियमानुसार अर्पण केले.


त्यांना नियमशास्त्रात असे लिहिलेले आढळले की परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सातव्या महिन्याच्या पर्वणीस मांडवांत राहावे.


पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ नित्य वाची. ह्या प्रकारे त्यांनी सात दिवसांपर्यंत सण पाळला आणि आठव्या दिवशी विधीपूर्वक सणाचा समारोप केला.


शेतात पेरलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ, आणि वर्षअखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ.


तू सप्ताहाचा सण म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथमपिकाचा सण पाळावास.


सातव्या महिन्याच्या पौर्णिमेपासून सणाचे सात दिवस पापबली, होमबली, अन्नबली आणि तेल ही ह्याप्रमाणेच अर्पण करावीत.


पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये.


सातव्या महिन्याच्या प्रतिपदेस पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे कसलेही काम करू नये; हा तुमचा कर्णे वाजवण्याचा दिवस होय.


परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते हे : तेरा गोर्‍हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा कोकरे; ही दोषहीन असावीत.


आठव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळ्याचा समारोप करावा; ह्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये.


शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan