Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 28:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वर मोशेला म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेहने मोशेला म्हटले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 28:1
17 Iomraidhean Croise  

तसेच शब्बाथाच्या व चंद्रदर्शनाच्या दिवशी व नेमलेल्या पर्वणीस ठरवलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरासमोर उभे राहून सर्व होमबली त्यांना त्यास अर्पावे लागत.


पाहा, मी आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ एक मंदिर बांधत आहे. ते परमेश्वराला समर्पण करून त्याच्यासमोर सुगंधी द्रव्यांनी युक्त असा धूप जाळावा, नित्य समर्पित भाकर तेथे ठेवावी आणि रोज सकाळी व संध्याकाळी, शब्बाथदिनी व चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वर ह्याने नेमलेल्या पर्वकाळी होमबली अर्पावेत म्हणून ते मी बांधत आहे. इस्राएलाचा हा निरंतरचा विधी होय.


मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे, त्याप्रमाणे व दाविदाने नेमून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराला होमबली अर्पून आनंदाने गायन करावे म्हणून दाविदाने लेवीय याजकांची परमेश्वराच्या मंदिरात वाटणी करून दिली होती, त्यांच्या हाती यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराचे अधिकार सोपवले.


मग त्याने आपल्या संपत्तीतून होमार्पणासाठी राजभाग ठरवला; परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे नित्य सकाळची व संध्याकाळची होमार्पणे, शब्बाथ, चंद्रदर्शने व नियतपर्वे ह्यांच्या होमबलींसाठी त्याने राजभाग ठरवला.


मोशेच्या आज्ञेस अनुसरून नित्यविधीप्रमाणे शब्बाथवारी, चंद्रदर्शनी आणि बेखमीर भाकरीचा सण, सप्तकांचा सण व मांडवांचा सण ह्या तीन नेमलेल्या वार्षिक सणांत तो होमबली अर्पण करीत असे.


स्वर्गीच्या देवास होमार्पणांसाठी गोर्‍हे, मेंढे, कोकरे आदिकरून ज्या वस्तू लागतील त्या आणि गहू, मीठ, द्राक्षारस व तेल, हे यरुशलेमेतील याजक जितके मागतील तितके प्रतिदिनी त्यांना द्यावे; ह्यात काही खंड पडू नये;


समर्पित भाकरी, नित्याचे अन्नार्पण, नित्याचे होमार्पण आणि शब्बाथ, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण ह्यासंबंधाची बलिदाने आणि पवित्र वस्तू, इस्राएलाच्या प्रायश्‍चित्तासाठी पापार्पणे, ह्या सर्वांसाठी आमच्या देवाच्या मंदिराच्या कामी लागणारा खर्च आम्ही द्यावा.


निरर्थक अर्पणे आणखी आणू नका; धूपाचा मला वीट आहे; चंद्रदर्शन, शब्बाथ व मेळे भरवणे मला खपत नाही; सणाचा मेळा हाही अधर्मच होय.


तंट्याबखेड्यांचा निवाडा करण्यास त्यांनी तत्पर असावे; माझ्या निर्णयांप्रमाणे हा निवाडा त्यांनी करावा; सर्व सणांत माझे विधी व नियम पाळावेत आणि माझ्या शब्बाथांचे पवित्रपणे पालन करावे.


उत्सव, चंद्रदर्शने, शब्बाथ व इस्राएल घराण्याचे सर्व सण ह्यांत होमार्पण, अन्नार्पण व पेयार्पण ह्यांची तरतूद करणे हे अधिपतींचे काम आहे; इस्राएल घराण्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणून त्याने पापार्पण, अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही सिद्ध करावीत.


उत्सवांच्या व सणांच्या दिवशी दर गोर्‍ह्यामागे एक एफा अन्नार्पण व दर एडक्यामागे एक एफा अन्नार्पण करावे; दर कोकरामागे यथाशक्ती अन्नार्पण करावे, आणि दर एफाबरोबर एक हिनभर तेल अर्पावे.


त्याने लोकांकडचे अर्पण जवळ नेले आणि त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणे तोही पापार्पण म्हणून अर्पण केला;


आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केल्याप्रमाणे त्याने त्याच्यावर हात ठेवून त्याला अधिकारारूढ केले.


“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, माझे अर्पण म्हणजे माझे सुवासिक हव्यान्न तुम्ही माझ्याप्रीत्यर्थ नियमित समयी अर्पण करण्यास जपा.


होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;


वार, महिने, सणाचे काळ व वर्षे ही तुम्ही पाळता.


तर मग खाण्यापिण्याविषयी, तसेच सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan