Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 27:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तो एलाजार याजकापुढे उभा राहील आणि एलाजार त्याच्या वतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारील; यहोशवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व मंडळी म्हणजे तो स्वतः व त्याच्यासहित सर्व इस्राएल लोक पुढे जातील आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे मागे येतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तो एलाजार याजकापुढे उभा राहील, तो त्याच्यावतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वरास विचारील. त्याने व त्याच्याबरोबर इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याच्या सांगण्यावरून बाहेर जावे व आत यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्याने एलअज़ार याजकापुढे उभे राहावे, जो याहवेहसमोर उरीमविषयी विचारेल. त्याच्या आज्ञेनुसार तो व सर्व इस्राएली समाज बाहेर जाईल व त्याच्या आज्ञेनुसार आत येतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 27:21
23 Iomraidhean Croise  

दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला; तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्‍न केला. परमेश्वराने उत्तर दिले, “शौल व त्याचे खुनी घराणे ह्यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे, कारण त्याने गिबोनी लोकांचा संहार केला.”


तिर्शाथा1 त्यांना म्हणाला, “उरीम व थुम्मीम धारण करणार्‍या याजकाची स्थापना होईपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र पदार्थ खाण्यास पात्र नाही.”


तिर्शाथा (प्रांताधिपती) ह्याने त्यांना सांगितले की, “उरीम व थुम्मीम धारण करणारा याजक उभा राहीपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र पदार्थ खाऊ नयेत.”


तू न्यायाच्या ऊरपटात उरीम व थुम्मीम1 ठेव. अहरोन परमेश्वरासमोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असावे; ह्या प्रकारे अहरोनाने इस्राएल लोकांचा न्याय आपल्या हृदयावर परमेश्वरासमोर नित्य वागवावा.


मग त्याने त्याच्यावर ऊरपट बांधला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेवले.


कारण याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून नियमशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे; कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या आहे;


तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल; तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणील. असे केले तर परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या शेरडा-मेंढरांप्रमाणे होणार नाही.”


मोशे, एलाजार याजक, सरदार व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ त्या उभ्या राहून म्हणाल्या,


आपला काही अधिकार त्याला दे; म्हणजे इस्राएल लोकांची सारी मंडळी त्याचे मानील.


परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले; त्याने यहोशवाला घेऊन एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर उभे केले;


मोशेने त्यांचे हे प्रकरण परमेश्वरापुढे मांडले.


तुझा देव परमेश्वर हा तुझ्यापुढे पलीकडे जाईल; तो त्या राष्ट्रांचा तुझ्यासमोर संहार करील व तू त्यांचा ताबा घेशील; परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुझ्यापुढे चालेल.


मग लेवीविषयी तो म्हणाला, ‘तुझे थुम्मीम व उरीम तुझ्या भक्ताजवळ राहोत;’ त्याला तू मस्सा येथे पारखले, मरीबाच्या झर्‍याजवळ तू त्याच्याशी झुंजलास;


तेव्हा लोकांनी त्यांचे अन्न स्वीकारले; पण परमेश्वराचा सल्ला घेतला नाही.


यहोशवाच्या मृत्यूनंतर इस्राएल लोकांनी परमेश्वराला विचारले की, “कनानी लोकांशी लढण्यासाठी आमच्या वतीने प्रथम कोणी स्वारी करावी?”


मग इस्राएल लोक निघून बेथेल येथे गेले आणि त्यांनी देवाला विचारले, “बन्यामिनी लोकांशी आमच्या वतीने लढण्यासाठी प्रथम कोणी चाल करून जावे?” परमेश्वराने उत्तर दिले, “प्रथम यहूदाने जावे.”


इस्राएल लोक जाऊन संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर रडले; आणि “आपला बंधू बन्यामीन ह्याच्या लोकांशी लढायला पुन्हा जावे काय?” असे परमेश्वराला त्यांनी विचारले. तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “त्यांच्यावर चाल करून जा.”


शौल याजकाशी बोलत असता पलिष्ट्यांच्या छावणीत गलबला वाढत चालला, तेव्हा शौल याजकाला म्हणाला, “आपला हात आवर.”


शौल आपला नाश करण्याची मसलत करीत आहे हे दाविदाला समजले तेव्हा तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.”


शौलाने परमेश्वराला प्रश्‍न विचारले असता परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही.


दावीद अहीमलेखाचा पुत्र अब्याथार याजक ह्याला म्हणाला, “एफोद माझ्याकडे आण. तेव्हा अब्याथाराने एफोद दाविदाकडे आणले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan