Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 27:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल; तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणील. असे केले तर परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या शेरडा-मेंढरांप्रमाणे होणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल. तो त्यांना बाहेर नेईल व आत आणील म्हणजे परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 की त्याने त्यांच्यापुढे बाहेर जावे व आत यावे, जो त्यांना बाहेर नेईल व आत आणेल, जेणेकरून याहवेहचे लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे होणार नाहीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 27:17
19 Iomraidhean Croise  

गतकाली शौल आमच्यावर राजा असता इस्राएल लोकांची नेआण करणारे पुढारी आपणच होता; आणि परमेश्वर आपणास म्हणाला होता की, माझी प्रजा इस्राएल हिचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.”


मग तो म्हणाला, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळावाचून असलेल्या मेंढरांसारखे डोंगरावरून विखरले आहेत असे मला दिसले; तेव्हा परमेश्वर म्हणाला, ह्यांना कोणी धनी नाही, तर हे आपापल्या घरी सुखरूप परत जावोत.”


आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला माझा बाप दावीद ह्याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे; चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही.


तुम्ही सर्वांनी हत्यारबंद होऊन राजाभोवती जमावे; कोणी पहार्‍याच्या आत आला की त्याला मारून टाकावे; राजा आतबाहेर जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर असावे.”


ह्या प्रजेसमोर वागण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे; तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करता येईल?”


मग तो म्हणाला, “सर्व इस्राएल मेंढपाळावाचून मेंढरांसारखे डोंगरावर विखुरले आहेत असे मला दिसले. तेव्हा परमेश्वर म्हणाला, ‘ह्यांना कोणी धनी नाही, तर हे आपापल्या घरी सुखरूप परत जावोत.”’


त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दाणादाण झाली; ती सर्व वनपशूंना भक्ष्य होऊन त्यांची दाणादाण झाली.


कारण तेराफीम3 व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत, दैवज्ञांनी खोटे दृष्टान्त पाहिले आहेत व फसवणारी स्वप्ने सांगितली आहेत; ते कोरडा धीर देतात; ह्यामुळे ते मेंढरांप्रमाणे भटकले आहेत. त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांच्यावर जुलूम होत आहे.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याच्यावर ऊठ; मेंढपाळावर प्रहार कर म्हणजे मेंढरे विखरतील; माझ्या लहानग्यांवर मी माझ्या हाताची छाया करीन.”


तर इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा.


त्याने उत्तर दिले, “इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही.”


तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ ते गांजलेले व पांगलेले होते.


येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांना बर्‍याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.


मी दार आहे. माझ्या द्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारणप्राप्ती होईल; तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल.


तो त्यांना म्हणाला, “मी आज एकशेवीस वर्षांचा आहे; ह्यापुढे मला ये-जा होणार नाही; शिवाय ‘तुला ह्या यार्देनेपलीकडे जायचे नाही,’ असे मला परमेश्वराने सांगितले आहे.


कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता; परंतु आता तुमच्या जिवांचा मेंढपाळ व संरक्षक1 ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात.


मग शौलाने दाविदाला आपल्यापासून दूर करून सहस्रपती नेमले; तो लोकांच्या पुढे चालत असे.


म्हणजे इतर सर्व राष्ट्रांसमान आम्ही होऊ; आमचा राजा आमचा न्यायनिवाडा करील व आमच्यापुढे चालून तो आमच्या लढाया लढेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan