Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 25:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 इस्राएल लोक शिट्टिमात राहत असता ते मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 इस्राएली शिट्टीमात राहत असताना त्यांनी मवाबी बायकांबरोबर व्यभिचार करू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 इस्राएली लोक शिट्टीम येथे राहत असताना, त्यांचे पुरुष तेथील मोआबी कन्यांशी व्यभिचार करू लागले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 25:1
22 Iomraidhean Croise  

त्याप्रमाणेच परमेश्वराच्या मंदिराला लागून पुरुषगमन करणार्‍यांची घरे होती ती त्याने मोडून टाकली; त्यांत स्त्रिया अशेरामूर्तींसाठी पडदे विणत असत.


ते पौर येथील बआल ह्या दैवतावर आसक्त झाले; त्यांनी निर्जीव मूर्तींना वाहिलेले बळी खाल्ले.


पशुगमन करणार्‍याला अवश्य जिवे मारावे.


तू सावध राहा. देशातील रहिवाशांशी तुला करारमदार करायचा नाही; नाहीतर ते व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे लागून त्यांना बलिदान करतील, आणि त्यांच्यातल्या कोणी तुला बोलावले असता तू त्यांच्या बलिदानातले काही खाशील;


मला मृत्यूहूनही दु:खदायी अशी एक वस्तू आढळली, ती पाशरूप झालेली स्त्री होय; तिचे हृदय केवळ पारध्याचे जाळे आहे; तिचे हात शृंखला आहेत; जो पुरुष देवाला प्रिय असतो तोच तिच्या हातून सुटतो; पापी तिच्या तावडीत सापडतो.


त्याचप्रमाणे मवाबात अम्मोनी लोकांमध्ये, अदोमात व इतर सर्व देशांत जे यहूदी होते त्या सर्वांनी जेव्हा ऐकले की बाबेलच्या राजाने यहूदाचा अवशेष देशात राहू दिला आहे व त्यांच्यावर गदल्या बिन अहीकाम बिन शाफान नेमला आहे,


तरीपण ते वंशजही मला फितूर झाले; जे पाळल्याने मनुष्य वाचतो त्या माझ्या नियमांप्रमाणे ते चालले नाहीत; ते माझे निर्णय त्यांनी टाकून दिले; माझे शब्बाथ त्यांनी भ्रष्ट केले; तेव्हा रानात त्यांच्यावर आपल्या क्रोधाची वृष्टी करून त्यांच्यावर माझा कोप पूर्ण करावा असे मी म्हटले.


रानातल्या द्राक्षांप्रमाणे इस्राएल मला आढळला, अंजिराच्या हंगामातील प्रथमफळासारखे तुमचे पूर्वज मला दिसले; पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीला त्यांनी आपणांस वाहून घेतले; त्यांच्या वल्लभांसारखे ते अमंगळ झाले.


माझ्या प्रजे, मवाबाचा राजा बालाक ह्याने काय मसलत केली, बौराचा पुत्र बलाम ह्याने त्याला काय उत्तर केले आणि शिट्टीम व गिल्गाल ह्यांच्या दरम्यान काय झाले ह्याचे स्मरण कर, म्हणजे परमेश्वराची न्यायकृत्ये तुला समजतील.” परमेश्वराला काय हवे?


“मिद्यान्यांचा पिच्छा पुरवून त्यांच्यावर मारा कर;


“इस्राएल लोकांच्या वतीने मिद्यान्यांचा सूड घे; त्यानंतर तू आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील.”


मवाबाच्या मैदानात यार्देनेतीरी बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टिमापर्यंत त्यांनी तळ दिला.


होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;


त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले; तेव्हा आपण जारकर्म करू नये.


म्हणून आम्ही बेथ-पौराच्या समोरील खोर्‍यात मुक्काम केला.


त्यांच्या यज्ञातली चरबी खाणारे, त्यांच्या पेयार्पणातला द्राक्षारस पिणारे देव कोठे आहेत? त्यांनी आता उठून तुम्हांला साहाय्य करावे व तुम्हांला आश्रय द्यावा.


बआल-पौराच्या प्रकरणी परमेश्वराने काय केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे; जे लोक बआल-पौरांच्या नादी लागले त्या सर्वांना तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यामधून नष्ट केले.


नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले; त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषत: यरीहो हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले.


पाहा, पौराच्या प्रकरणी जो आमच्याकडून अपराध घडला त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीवर मरी येऊन गेली, तरी आजवर आम्ही त्या अपराधापासून शुद्ध झालो नाही,


यहोशवा पहाटेस उठला आणि सर्व इस्राएल लोकांसह शिट्टीमाहून कूच करून यार्देनतीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला.


तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे; त्या ह्या की, ‘बलामाच्या’ शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत; त्याने ‘मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे व जारकर्म करणे,’ हे अडखळण ‘इस्राएलाच्या संतानांपुढे’ ठेवण्यास बालाकाला शिकवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan