Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 24:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 देवाने त्याला मिसर देशातून बाहेर आणले आहे; त्याचे बळ रानबैलाच्या बळासारखे आहे; तो आपल्या शत्रुराष्ट्रांना ग्रासून टाकील, त्यांच्या हाडांचा चुराडा करील, आपल्या बाणांनी त्यांना छेदून टाकील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 देवाने त्यांना मिसरामधून बाहेर आणले. त्यांना रानटी बैलासारखी शक्ती आहे. तो आपल्याविरूद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना खाऊन टाकील. तो त्यांच्या हाडांचे तुकडे तुकडे करील. तो आपल्या बाणांनी त्यांना मारील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “परमेश्वराने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले; रानबैलासारखे त्यांचे बळ आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रांचा ते नाश करतात आणि त्यांच्या हाडांचे ते तुकडे करतात; ते आपल्या बाणांनी त्यांना भोसकतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 24:8
18 Iomraidhean Croise  

लोहदंडाने तू त्यांना फोडून काढशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील.”


कारण तू त्यांना पाठ दाखवण्यास लावशील, तू आपल्या धनुष्याची दोरी ओढून त्यांच्या मुखावर नेम धरशील.


तुझे बाण तीक्ष्ण आहेत; लोक तुझ्यापुढे चीत होतात; तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात शिरतात.


तुझे राजासन देवाच्या राजासनासारखे युगानुयुगाचे आहे;1 तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे.


तथापि तू त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकशील व मी सांगतो ते सगळे करशील, तर मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईन आणि तुझ्या विरोधकांचा विरोधक होईन.


सकाळपर्यंत मी आपले मन शांत करीत राहिलो; तो सिंहाप्रमाणे माझी सर्व हाडे मोडणार; दिवस जाऊन रात्र येईल तेव्हा तू माझा अंत करशील.


“इस्राएल भटकलेले मेंढरू आहे; सिंहांनी त्याला बुजवले आहे; त्याला प्रथम खाणारा अश्शूराचा राजा; शेवटी त्याची हाडे मोडणारा बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर.


कारण पाहा, मी उत्तर देशाहून मोठ्या राष्ट्रांचा जमाव उठवून बाबेलवर आणीन; ते त्याच्याविरुद्ध सज्ज होतील; त्याच दिशेकडून तो हस्तगत होईल; रिकामा परत येत नाही अशा चतुर वीराच्या बाणांप्रमाणे त्यांचे बाण आहेत.


तेव्हा ज्या माणसांनी दानिएलावर आरोप आणला होता त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायकामुलांना सिंहांच्या गुहेत टाकले; तेव्हा ते सिंहांच्या तडाक्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला.


तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका; आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील; त्यांचा आधार तुटला आहे, पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे; त्यांची भीती बाळगू नका.”


ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की, “तुम्ही आम्हांला मिसर देशातून काढून ह्या रानात मरायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही, आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत.”


देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले; जणू काय रानबैलांचे बळ त्यांच्या ठायी आहे.


पाहा, हे राष्ट्र सिंहिणीसारखे उठत आहे. सिंहाप्रमाणे ते उभे राहत आहे; शिकार भक्षण करीपर्यंत, वधलेल्याचे रुधिर प्राशन करीपर्यंत ते बसायचे नाहीत.”


आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला; “मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे” हे जे प्रभूने संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.


मी त्यांच्यावर अरिष्टांची रास रचीन, त्यांच्यावर मी आपले बाण सोडीन;


वधलेल्यांचे, पाडाव केलेल्यांचे आणि शत्रूंच्या केसाळ मस्तकांचे रक्त पाजून मी माझ्या बाणांना मस्त करीन; माझी तलवार मांस भक्षील.’


जो देश वतन करून घेण्यासाठी तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेईल आणि तुमच्यापेक्षा मोठी आणि समर्थ अशी पुष्कळ राष्ट्रे म्हणजे हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ही सात राष्ट्रे तुमच्यासमोरून घालवून देईल;


कारण तुम्ही मिसर देशाहून निघालात तेव्हा तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटवले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोर्‍यांचे दोन राजे सीहोन व ओग ह्यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan