Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 24:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याच्या मोटेतून पाणी वाहील. त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल; त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पाणी त्यांच्या बादलीतून वाहील, आणि त्यांच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल. त्यांचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्यांच्या राजाचा गौरव होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्यांच्या पोहर्‍यातून पाणी वाहेल; त्यांच्या बिजांना भरपूर पाणी मिळेल. “त्यांचा राजा अगाग राजापेक्षा महान असेल; त्यांचे राज्य गौरवित केले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 24:7
29 Iomraidhean Croise  

परमेश्वराने इस्राएलावरील आपले राज्य स्थिर केले आहे आणि आपल्या इस्राएली प्रजेप्रीत्यर्थ आपल्या राज्याची उन्नती केली आहे हे दाविदाच्या ध्यानात आले.


महानदापासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत व मिसर देशाच्या सरहद्दीपर्यंत सर्व राज्यांवर शलमोनाने राज्य केले; तेथील लोकांनी शलमोनाच्या सर्व आयुष्यभर त्याला करभार दिला व ते त्याचे अंकित राहिले.


काही दिवसांनी सोरचा राजा हीराम ह्याने आपले सेवक शलमोनाकडे पाठवले; शलमोनाचा अभिषेक होऊन तो आपल्या बापाच्या जागी गादीवर बसल्याचे वर्तमान त्याने ऐकले होते; हीराम व दावीद ह्यांची अखंड मैत्री होती.


परमेश्वराने इस्राएलावरील आपले राज्य स्थिर केले आणि आपल्या इस्राएली प्रजेप्रीत्यर्थ आपल्या राज्याची उन्नती केली हे दाविदाच्या लक्षात आले.


ह्या यरुशलेमेत पराक्रमी राजे होऊन गेले; त्यांनी महानदाच्या पश्‍चिमेकडल्या सगळ्या देशांवर राज्य केले; लोक त्यांना खंडणी, कर व जकात देत असत.


ह्या गोष्टी घडल्यावर अहश्वेरोश राजाने अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याला बढती देऊन उच्च पदास चढवले व त्याच्याबरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उंच केले.


लोकांच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केलेस; तू मला राष्ट्रांचा प्रमुख केलेस; जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले.


“ज्यांचा उगम इस्राएलापासून आहे असे तुम्ही, प्रभू जो देव त्याचा जनसभांत धन्यवाद करा.”


सर्व राजे त्याला दंडवत घालोत; सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत.


मी तर त्याला ज्येष्ठ करीन. पृथ्वीवरील राजांत त्याला सर्वश्रेष्ठ करीन.


शेवटच्या दिवसांत असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याच्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील.


मोठ्या कत्तलीच्या दिवशी बुरूज पडतील तेव्हा प्रत्येक उंच डोंगरावर व प्रत्येक उंच टेकडीवर झरे व ओहोळ होतील.


हे याकोबाच्या घराण्या, ऐक, तुला इस्राएल हे नाव आहे, तू यहूदाच्या झर्‍यातून निघाला आहेस; तू परमेश्वराच्या नामाची शपथ वाहतोस व इस्राएलाच्या देवाचे स्तवन करतोस, पण सत्याने व नीतिमत्तेने नव्हे.


त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


हे बहुत जलप्रवाहाजवळ राहणार्‍या, समृद्ध भांडारे असलेल्या, तुझा अंतसमय आला आहे, तुझ्या मिळकतीस आळा बसला आहे.


त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसर्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते ह्या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांना नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.


मग अमालेकास उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला, “अमालेक राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होता, पण शेवटी तोही लयास जाईल.”


नथनेल त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्राएलाचे राजे आहात.”


सातव्या देवदूताने कर्णा वाजवला; तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्या : “जगाचे ‘राज्य’ आमच्या ‘प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे’ झाले आहे; आणि ‘तो युगानुयुग राज्य करील.”’


नंतर सात वाट्या घेतलेल्या सात देवदूतांपैकी एक जण येऊन माझ्याबरोबर बोलू लागला; तो म्हणाला, “इकडे ये, म्हणजे ‘अनेक जलप्रवाहांवर’ बसलेल्या मोठ्या कलावंतिणीचा2 झालेला न्यायनिवाडा तुला दाखवतो;


आणखी तो मला म्हणाला, “जेथे कलावंतीण बसली आहे, तेथे ‘जे जलप्रवाह’ तू पाहिलेस, ते लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहेत.


त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan