Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 24:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 हे याकोबा, तुझे डेरे, हे इस्राएला, तुझे निवासमंडप किती रमणीय आहेत!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 हे याकोबा तुझे तंबू, हे इस्राएला, जिथे तू राहतो ते किती सुंदर आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “हे याकोबा, तुझे तंबू, हे इस्राएला, तुझी राहण्याची ठिकाणे किती सुंदर आहेत!

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 24:5
13 Iomraidhean Croise  

कारण ते अन्नपाणी घेऊन इस्राएल लोकांना सामोरे आले नाहीत, पण उलट शाप द्यावा म्हणून बलामास त्यांनी दक्षिणा देऊन बोलावले; तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला.


माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहेत.


निवासमंडपाचे म्हणजे साक्षपटाच्या निवासमंडपाचे जे सामान लेव्यांच्या सेवेकरता केले त्याची यादी मोशेच्या सांगण्यावरून अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याने केली तीच ही.


माझ्या प्रिये, तू सर्वांगसुंदर आहेस; तुझ्यात काही व्यंग नाही.


माझ्या सखे, तू तिरसा नगरीप्रमाणे सुंदर, यरुशलेमेप्रमाणे सुरेख आहेस; ध्वजा फडकवणार्‍या सेनेसारखी तू हैराण करणारी आहेस.


तुम्ही सात दिवस मांडवात राहावे; जितके जन्मतः इस्राएल आहेत त्यांनी मांडवात राहावे;


जो मनुष्य असे करतो तो हाक मारणारा असो, उत्तर देणारा असो, किंवा सेनाधीश परमेश्वराला यज्ञार्पण करणारा असो, त्याला परमेश्वर याकोबाच्या डेर्‍यातून नाहीसे करील.


त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले; म्हणजे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते आपापली कुळे व आपापल्या वाडवडिलांची घराणी ह्यांच्या अनुक्रमाने आपापल्या निशाणाजवळ डेरे ठोकत आणि कूच करीत.


बलामाने दृष्टी वर करून पाहिले तर, इस्राएल लोक आपापल्या वंशांप्रमाणे वस्ती करून राहत आहेत असे त्याला दिसले; देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला.


जो देवाची वचने श्रवण करतो ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते; जो दंडवत घालतो, ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे :


खजुरीच्या विस्तृत बनासारखे, नदीतीरीच्या बागांसारखे, परमेश्वराने लावलेल्या अगरू वृक्षांसारखे, पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत.


हे इस्राएला, तू धन्य आहेस! परमेश्वराने उद्धरलेल्या राष्ट्रा, तुझ्यासमान कोण आहे? तो तुझ्या साहाय्याची ढाल आहे, तुझ्या प्रतापाची तलवार आहे. ह्यामुळे तुझे शत्रू तुला शरण येतील, तू त्यांची उच्च स्थाने पादाक्रांत करशील.”


पण मी बलामाचे ऐकायला तयार नव्हतो म्हणून त्याने तुम्हांला उलट आशीर्वाद दिला; अशा प्रकारे मी तुम्हांला त्याच्या हातातून सोडवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan