Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 24:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तरी कित्ती ह्यांच्या किनार्‍यावरून जहाजे येतील, ती अश्शूरास व एबेरास त्रस्त करतील; तरी शेवटी त्यांचाही नाश होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 कित्तीमाच्या किनाऱ्यापासून जहाजे येतील; ते अश्शूरावर हल्ला करतील आणि एबर जिंकून घेतील. पण त्यांचासुद्धा नाश होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 कित्तीमाच्या किनार्‍यावरून जहाजे येतील; ते अश्शूर व एबर यांच्यावर जुलूम करतील, परंतु त्यांचाही नाश होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 24:24
24 Iomraidhean Croise  

यावानाचे मुलगे : अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.


तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्राम इब्री ह्याला हे वर्तमान सांगितले, त्या वेळी तो अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ अमोरी मम्रे ह्याच्या एलोन राईत राहत होता; हे अब्रामाच्या जुटीतले होते.


ह्यास्तव प्रभूने सीयोन डोंगर यरुशलेम ह्यासंबंधाने आपले समग्र कार्य समाप्त केल्यावर असे होईल की अश्शूरचा राजा ह्याच्या मनातील गर्वाचा परिणाम व त्याच्या उन्मत्त दृष्टीचा दिमाख ह्यांचा बदला मी घेईन.


जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातातील सोटा माझा कहर आहे त्या अश्शूरास धिक्कार असो.


सोराविषयीची देववाणी : तार्शीशच्या गलबतांनो, हायहाय करा; त्याचा विध्वंस झाला आहे; तेथे आता घरदार किंवा बंदर राहिले नाही; कित्ती लोकांच्या देशातून त्यांना ही खबर कळली.


त्यांनी तुझी वल्ही बाशानातील अल्लोनाच्या झाडांची केली; तुझ्या बैठकी कित्तीम द्वीपातल्या अश्शूरी (बाक्स) लाकडाच्या केल्या असून हस्तिदंताने जडलेल्या होत्या.


मग तो म्हणाला, “मी तुझ्याकडे का आलो हे तुला माहीत आहे काय? आता मी पारसाच्या अधिपतीबरोबर लढायला जातो; मी गेलो म्हणजे ग्रीसचा1 अधिपती येईल.


कारण कित्तिमाची जहाजे त्याच्यावर चाल करून येतील, म्हणून तो खिन्न होऊन मागे फिरेल आणि पवित्र करारावर रुष्ट होऊन आपल्या मनास वाटेल तसे करील; तो परत जाईल व पवित्र करार सोडणार्‍यांबरोबर स्नेह करू पाहील.


समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वतांच्या दरम्यान तो आपले दरबारी तंबू ठोकील; पण त्याचा अंत येईल, कोणी त्याला साहाय्य करणार नाही.”


तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपे व सोने ह्यांचे चूर्ण होऊन उन्हाळखळ्यातील भुसाप्रमाणे ती झाली. वार्‍याने ती उधळून नेली; त्यांचा मागमूस राहिला नाही; त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली.


आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला आणि त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे व सोने ह्यांचे चूर्ण केले; त्यावरून पुढे काय होणार हे त्या थोर देवाने महाराजांच्या हुजुरास कळवले आहे; हेच आपले स्वप्न व त्याचा अर्थही निःसंशय हाच आहे.”


तो दांडगा बकरा ग्रीसचा2 राजा; त्याच्या डोळ्यांच्या मधोमध असलेले मोठे शिंग हा पहिला राजा.


मग अमालेकास उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला, “अमालेक राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होता, पण शेवटी तोही लयास जाईल.”


तो आपला काव्यरूपी संदेश पुढे चालवून म्हणाला, “हाय! हाय! देव हे घडवून आणील तेव्हा कोणाचा जीव वाचेल?


दानिएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात’ उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचकाने हे ध्यानात आणावे),


मला एक नाणे दाखवा. ह्याच्यावरील मुखवटा व लेख कोणाचा आहे?” ते म्हणाले, “कैसराचा.”


आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan