Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 24:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 याकोबातून एक नियंता निघेल, तो नगरातल्या उरलेल्या लोकांचा संहार करील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 याकोबाच्या घराण्यातून एक राजा येईल तो त्यांच्यावर राज्य करील, आणि तो त्यांच्या शहरातील उरलेल्यांचा नाश करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 याकोबातून एक अधिकारी येईल आणि नगरातील उरलेल्यांचा नाश करेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 24:19
19 Iomraidhean Croise  

यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.


त्या दिवशी असे होईल की राष्ट्रांसाठी ध्वजवत उभारलेल्या इशायाच्या धुमार्‍याला राष्ट्रे शरण येतील; त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल.


हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.


तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील, तो कळप चारील; आणि ते वस्ती करतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल.


त्याचे शत्रू अदोम व सेईर हे त्याच्या ताब्यात येतील तोवर इस्राएल आपला प्रभाव दाखवील.


मग अमालेकास उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला, “अमालेक राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होता, पण शेवटी तोही लयास जाईल.”


‘ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील.”’


तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.


तो म्हणाला, “कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूर देशी गेला.


आता ज्या माझ्या वैर्‍यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांना येथे आणा व माझ्यादेखत ठार मारा.”


कारण आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केले पाहिजे.


पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, “हे देवा, तुझे राजासन युगानुयुगाचे आहे; आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे.


तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता ‘देवाच्या उजवीकडे’ आहे, त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत.


त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan