Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 23:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 बलाम काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला, “बालाकाने मला अरामाहून, मवाबाच्या राजाने मला पूर्वेकडील डोंगरवटीहून बोलावून आणले आहे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 नंतर बलामाने आपला संदेश सांगण्यास सुरवात केली आणि म्हणाला, पूर्वेकडील अराम पर्वतावरुन मवाबाचा राजा बालाक याने मला येथे आणले. तो म्हणाला, ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे, ये, इस्राएलींना विरोध कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तेव्हा बलामाने आपला संदेश सांगितला: “बालाकाने मला अरामाहून आणले, मोआबाच्या राजाने पूर्वेकडील डोंगरातून मला आणले. तो म्हणाला, ‘ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे; ये, इस्राएलाचा धिक्कार कर.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 23:7
31 Iomraidhean Croise  

शेमाचे मुलगे : एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.


तर ऊठ, पदन-अराम येथे तुझ्या आईचा बाप बथुवेल ह्याच्या घरी जा व तुझा मामा लाबान ह्याच्या मुलींपैकी बायको कर.


आणि याकोब आपल्या आईबापांची आज्ञा मानून पदन-अरामास गेला आहे.


त्याने इस्राएलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी ह्याचा पुत्र योनाथान ह्याने त्याचा वध केला.


त्याच्या खालोखाल एलाजार बिन दोदय बिन अहोही हा होता; दाविदाबरोबरच्या तिघा महावीरांपैकी हा एक होता, युद्धासाठी जमा झालेल्या पलिष्ट्यांना तुच्छ लेखून इस्राएल लोक त्यांच्यावर चालून गेले;


ईयोब आपला वाद पुढे चालवून म्हणाला,


ईयोब आपला वाद पुढे चालवून म्हणाला,


मला फसवणार्‍यांचा दुष्टपणा मला वेढतो; अशा विपत्काली मी का भ्यावे?


मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन; प्राचीन काळच्या गूढ गोष्टींचे निवेदन करीन.


भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी ह्यांच्याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही.


“मानवपुत्रा, इस्राएल घराण्यास कोडे घाल, हा दृष्टान्त कथन कर;


मी म्हणालो, “अहा! प्रभू परमेश्वरा! लोक माझ्याविषयी म्हणतात, ‘हा दृष्टान्त सांगणारा नव्हे काय?”’


त्या दिवसांत लोक तुम्हांला उद्देशून बोलतील, विव्हळून शोक करतील व म्हणतील, “आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे; तो माझ्यापासून कसा काढून घेतला आहे! आमचे क्षेत्र बंडखोरांना त्याने वाटून दिले आहे.”


हे सर्व त्याला कवन, कूटवचन लावून बोलणार नाहीत काय? लोक म्हणतील, “आपला माल नव्हे त्याने जो आपली वृद्धी करतो व गहाणांचा बोजा आपणावर लावून घेतो, त्याला धिक्कार असो; असे कोठवर?”


‘पाहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्याने भूतल झाकून टाकले आहे; तर आता तू येऊन माझ्याकरता त्यांना शाप दे; तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढून मला त्यांना कदाचित हाकून लावता येईल.”’


मी खात्रीने तुझा मोठा सन्मान करीन; तरी तू अवश्य येऊन माझ्याकरता ह्या लोकांना शाप दे.”’


तेव्हा बलाम काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला,


तो त्याच्याकडे परत गेला तेव्हा बालाक व सर्व मवाबी सरदार हे आपल्या होमबलीजवळ उभे होते.


मग तो आपला काव्यरूपी संदेश पुढे देऊ लागला, “बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे;


मग केनी राष्ट्राला उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला, “तुझे वसतिस्थान तर मजबूत आहे, तुझे घरटे खडकात आहे;


तो आपला काव्यरूपी संदेश पुढे चालवून म्हणाला, “हाय! हाय! देव हे घडवून आणील तेव्हा कोणाचा जीव वाचेल?


तो काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला, “बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे;


त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”


ह्यासाठी की, संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, “मी आपले तोंड उघडून दाखले देईन; जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन.”


तेव्हा ते त्याला धरण्यास पाहू लागले, परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली; कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून गेले.


कारण तुम्ही मिसर देशाहून येत असताना ते अन्नपाणी घेऊन तुमच्या भेटीस आले नाहीत, एवढेच नव्हे तर त्यांनी तुला विरोध करून अराम-नहराईम1 येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला द्रव्य देऊन तुला शाप देण्यासाठी आणले.


तो पलिष्टी म्हणाला, “इस्राएलाच्या सर्व सैन्याला मी कस्पटासमान लेखत आहे. कोणाही पुरुषाला माझ्यापुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू.”


आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे.”


तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्यावर चालून आलास; पण इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस; त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan