Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 23:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 पाहा, हे राष्ट्र सिंहिणीसारखे उठत आहे. सिंहाप्रमाणे ते उभे राहत आहे; शिकार भक्षण करीपर्यंत, वधलेल्याचे रुधिर प्राशन करीपर्यंत ते बसायचे नाहीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 पहा, लोक सिंहिणीसारखे उठत आहेत, सिंहासारखा बाहेर येतो आणि हल्ला करतो. तो त्याची शिकार खाऊन आणि वधलेल्यांचे रक्त प्यायल्याखेरीज तो खाली बसणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 लोक सिंहिणीप्रमाणे उठतात; ते सिंहासारखे उभे राहतात जे त्याची शिकार खाईपर्यंत व वधलेल्यांचे रक्त पिईपर्यंत विसावा घेत नाहीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 23:24
20 Iomraidhean Croise  

बन्यामीन हा फाडून टाकणारा लांडगा आहे, सकाळी तो शिकार खाऊन टाकील, सायंकाळी लुटीचे वाटे करील.”


यहूदा सिंहाचा छावा आहे; माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस; तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे, त्याला कोण छेडणार?


त्या सहा पायर्‍यांच्या दोन्ही बाजूंना एकेक असे एकंदर बारा सिंह केले होते; दुसर्‍या कोणत्याही राज्यात ह्यासारखे केलेले सिंहासन नव्हते.


सिंहासनास सहा पायर्‍या आणि सोन्याचे पादपीठ लावले; सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना हात होते व ह्या दोन हातांच्या बाजूंना दोन सिंह केले.


भक्ष्य फाडण्यास उतावळा झालेल्या सिंहासारखा किंवा टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा, तो आहे.


ते हे : सर्व वनपशूंत बलवान व कोणालाही पाठ न दाखवणारा सिंह;


परमेश्वर मला म्हणाला, “जसा सिंह, तरुण सिंह, आपल्या भक्ष्यावर गुरगुरत असता, मेंढरांची टोळी बोलावून त्याच्यावर घातली तरी त्यांच्या आरोळीने घाबरायचा नाही व त्यांच्या गोंगाटाने दबायचा नाही, तसा सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर त्याच्या टेकडीवर लढायला उतरेल.”


त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसर्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते ह्या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांना नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.


सिंहाने गर्जना केली आहे; त्याला भिणार नाही असा कोण? प्रभू परमेश्वर बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल?”


सिंहांची गुहा कोठे आहे? तरुण सिंहांची खुराक खाण्याची जागा कोठे आहे? जेथे सिंह, सिंहीण व सिंहाचा छावा ही फिरत असत व कोणी त्यांना भेडसावत नसे ते ठिकाण कोठे आहे?


सिंह आपल्या छाव्यांसाठी पुरेसे भक्ष्य फाडत असे, आपल्या सिंहिणीसाठी सावजाचा गळा दाबत असे, तो भक्ष्याने आपल्या गुहा, शिकारीने आपल्या गुंफा भरत असे.


त्या दिवशी मी यहूदाच्या सरदारांना लाकडाखालच्या आगटीसारखे, पेंढ्याखालच्या जळत्या मशालीसारखे करीन; ते उजवीकडील व डावीकडील सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना खाऊन टाकतील; यरुशलेम आपल्या पूर्वीच्या जागी म्हणजे यरुशलेमेच्या जागी पुन्हा वसेल.


बालाक बलामाला म्हणाला, “तू त्यांना शापही देऊ नकोस आणि आशीर्वादही देऊ नकोस.


मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही; त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही; याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल, तो मवाबाचा कपाळमोक्ष करील, सर्व बंडखोरांना चीत करील.


गादाविषयी तो म्हणाला, ‘गादाचा विस्तार करणारा तो धन्य; तो सिंहासारखा बसतो, तो बाहू व मस्तक फोडतो.


तेव्हा वडीलमंडळापैकी एक जण मला म्हणाला, “रडू नकोस; पाहा, ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’, दाविदाचा ‘अंकुर’ ह्याने जय मिळवला; म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan