Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 23:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 याकोबावर काही मंत्रतंत्र चालायचे नाहीत; इस्राएलावर काही चेटूक चालायचे नाही. यथाकाळी याकोब व इस्राएल ह्यांच्याविषयी असे म्हणतील, ‘देवाने केवढे कार्य केले!’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 याकोबाच्याविरूद्ध मंत्रतंत्र चालणार नाही आणि इस्राएलींना दैवप्रश्र सांगणारे हानी पोचवू शकत नाही, याकोबाविषयी व इस्राएलाविषयी म्हणतील की पहा, देवाने केवढे महान कार्य केले!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 याकोबाविरुद्ध मंत्रतंत्र नाही, इस्राएलविरुद्ध अपशकुन नाही. याकोबाविषयी व इस्राएलाविषयी असे म्हटले जाईल, परमेश्वराने काय केले आहे ते पाहा!

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 23:23
31 Iomraidhean Croise  

आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”


तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणार्‍यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय करणार्‍यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस.


तेव्हा मानवजातीस धाक बसेल; ते देवाची कृती वाखाणतील व त्याच्या कृतीचा नीट विचार करतील.


हे कार्य कोणी केले? ते शेवटास कोणी नेले? जो प्रारंभापासून एकामागून एक पिढ्या जन्मास आणतो त्यानेच. तो मी परमेश्वर आदी आहे व अंती असणार्‍यांनाही तो मीच आहे.


खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञांना वेडे ठरवणारा, ज्ञानी लोकांना मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे.


कारण बाबेलचा राजा चवाठ्यावर, दोन रस्ते फुटतात तेथे शकुन पाहण्यासाठी थांबला आहे; तो भात्यांतले बाण हलवून प्रश्‍न पाहत आहे, तेराफीमांना1 कौल लावत आहे, यज्ञपशूच्या काळजावरून शकुन पाहत आहे.


आता हे प्रभो, आमच्या देवा, तू आपल्या सामर्थ्यवान हाताने मिसर देशातून आपल्या लोकांना बाहेर आणले व आजच्याप्रमाणे आपला महिमा वाढवला. आम्ही पाप केले आहे; आम्ही दुराचरण केले आहे.


तू मिसर देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन.


इस्राएलाला आशीर्वाद देणे परमेश्वराला बरे दिसले असे जेव्हा बलामाने पाहिले तेव्हा तो पूर्वीप्रमाणे शकुन पाहायला गेला नाही, तर त्याने आपले तोंड रानाकडे केले.


येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसांत फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही.


आणि मी जर बाल्जबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील.


आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.


ह्यावरून मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, “आपण काय करत आहोत? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करतो.


नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता.


तेव्हा सर्व लोक गप्प राहिले, आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे व अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.


“ह्या माणसांना आपण काय करावे? कारण त्यांच्याकडून खरोखर प्रसिद्ध चमत्कार घडला आहे, हे सर्व यरुशलेमकरांना कळून चुकले आहे; तेव्हा ते आपल्याला नाकारता येत नाही.


प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत; आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या देवडीत जमत असत.


विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया ह्यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले;


शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो.


‘हे प्रभू परमेश्वरा, तू आपल्या दासाला आपला प्रताप व आपला समर्थ हात दाखवू लागला आहेस; तुझ्यासारखी कार्ये करणारा व पराक्रम करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर कोण आहे?


इस्राएल लोकांनी तलवारीने ज्यांचा संहार केला त्यांत बौराचा पुत्र बलाम दैवज्ञ हाही होता.


मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल1 व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan