गणना 23:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 बालाक त्याला म्हणाला, “चल, माझ्याबरोबर दुसर्या ठिकाणी ये. तेथून ते तुझ्या दृष्टीस पडतील, पण ते सर्व तुला दिसायचे नाहीत, केवळ कडेकडेचे दिसतील. तेथून माझ्याकरता त्यांना शाप दे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नंतर बालाक त्यास म्हणाला, म्हणून माझ्याबरोबर दुसऱ्या जागी ये. तिथून तुला ह्यातील आणखी बरेच लोक दिसू शकतील. तू त्या सगळ्यांना बघू शकणार नाहीस. पण त्यांचा काही भाग तुला दिसू शकेल. कदाचित त्या जागेवरुन तू त्यांना माझ्यासाठी शाप दे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा बालाक त्याला म्हणाला, “माझ्याबरोबर दुसर्या ठिकाणी चल जिथून तू त्यांना पाहू शकशील; तुला ते सर्व दिसणार नाहीत तर केवळ त्यांच्या छावणीचा शेवटचा भाग मात्र दिसेल. तिथून त्यांना माझ्यासाठी शाप दे.” Faic an caibideil |
म्हणून तू अवश्य येऊन माझ्याकरता ह्या लोकांना शाप दे; कारण हे माझ्यापेक्षा प्रबळ आहेत; तू असे केलेस तर कदाचित मी प्रबळ होईन आणि त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालवून देण्यास समर्थ होईन; कारण मला ठाऊक आहे की, ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो व ज्याला तू शाप देतोस त्याला शाप लागतो.”