Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 23:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोर्‍हे व सात मेंढे तयार ठेव.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 बलाम बालाकाला म्हणाला, इथे सात वेद्या बांधा आणि माझ्यासाठी सात बैल आणि सात मेंढे तयार ठेवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 बलाम बालाकाला म्हणाला, “या ठिकाणी माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोर्‍हे व सात मेंढे तयार ठेव.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 23:1
19 Iomraidhean Croise  

तू मला म्हणशील, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवतो, तर ज्याची उच्च स्थाने व वेदी काढून टाकून यहूदा व यरुशलेम ह्यांना हिज्कीया म्हणाला की, ‘ह्या एका वेदीपुढे यरुशलेमेत भजन करा, तोच नव्हे का तो देव?’


देवाने परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेण्यासाठी लेव्यांना साहाय्य केले तेव्हा त्यांनी सात बैल व सात मेंढे ह्यांचा यज्ञ केला.


तेव्हा राज्य, पवित्रस्थान व यहूदा ह्यांच्यासाठी त्यांनी सात गोर्‍हे, सात एडके, सात कोकरे व पापार्पणासाठी सात बोकड आणले. मग ते परमेश्वराच्या वेदीवर अर्पावेत अशी अहरोन वंशातील याजकांना त्याने आज्ञा केली.


तर आता तुम्ही सात बैल व सात एडके घेऊन माझा सेवक ईयोब ह्याच्याकडे जा व आपल्यासाठी होमबली अर्पण करा; मग माझा सेवक ईयोब तुमच्यासाठी प्रार्थना करील; कारण मी त्याच्यावरच अनुग्रह करीन; म्हणजे मग माझा सेवक ईयोब जसे माझ्याविषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही, ह्या तुमच्या मूर्खपणाचे फळ तुम्हांला मिळणार नाही.”


माझ्यासाठी एक मातीची वेदी कर आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे कर, जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन.


दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते.


लोक येतात तसे ते तुझ्याकडे येऊन माझ्या लोकांच्या रीतीप्रमाणे तुझ्यापुढे बसतात, ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत; ते तोंडाने गोडगोड गोष्टी बोलतात, पण त्यांचे मन लोभवश झाले आहे.


परमेश्वराला होमार्पण करण्यासाठी सणाचे सात दिवस त्याने सात निर्दोष गोर्‍हे व सात मेंढे सिद्ध करावेत आणि पापार्पणासाठी रोज एक बोकड सिद्ध करावा;


सकाळी बालाक बलामाला बामोथ-बआलाच्या उंच स्थानी घेऊन गेला व तेथून त्याने इस्राएल लोकांचा जवळचा पसारा पाहिला.


बलामाच्या सांगण्याप्रमाणे बालाकाने केले; आणि बालाक व बलाम ह्यांनी प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला.


बलाम बालाकाला म्हणाला, “येथे माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि सात गोर्‍हे व सात मेंढे तयार ठेव.”


बालाकाने बलामाच्या म्हणण्याप्रमाणे केले; त्याने प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला.


सातव्या दिवशी सात गोर्‍हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही.


त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांतिमार्गात बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला.


तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan