Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 22:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 बलाम आल्याचे ऐकून बालाक त्याचे स्वागत करण्यासाठी आर्णोन नदीतीरी देशाच्या अगदी सीमेवर असलेल्या मवाब नगराकडे गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 बलाम येत असल्याचे बालाकाला समजले. म्हणून तो बलामास भेटायला आर्णोन नदीजवळच्या मवाबाच्या शहरात गेला. ते त्याच्या देशाच्या उत्तर सरहद्दीवर होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 बलाम येत आहे, हे जेव्हा बालाकाने ऐकले, तेव्हा तो त्याला भेटण्याकरिता आर्णोनाच्या तीरावर, त्याच्या देशाच्या सीमेवर असलेल्या मोआबाच्या नगराकडे गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 22:36
14 Iomraidhean Croise  

कदार्लागोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे ह्यांना मारून तो माघारी येत असता त्याला भेटायला सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरा गेला.


त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेर्‍याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले;


योसेफ आपला रथ सिद्ध करून आपला बाप इस्राएल ह्याला भेटायला गोशेन प्रांतास गेला; त्याला भेटून त्याच्या गळ्यास त्याने मिठी मारली आणि त्याच्या गळ्यात गळा घालून तो फार वेळ रडला.


तेव्हा मोशे आपल्या सासर्‍यास सामोरा गेला आणि त्याने त्याला नमन करून त्याचे चुंबन घेतले; त्यांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारल्यावर ते डेर्‍यात गेले.


कारण कोट्यांतून उडवलेल्या भटकणार्‍या पाखरांप्रमाणे मवाबाच्या कन्या आर्णोनच्या उतारांजवळ भटकतील.


मवाब फजीत झाला; हायहाय करा, रडा; मवाब ओसाड झाला आहे, हे आर्णोनात सांगा.


परमेश्वराचा दूत बलामाला म्हणाला, “ह्या मनुष्यांबरोबर जा, मात्र जे शब्द मी तुला सांगेन तेवढेच बोल.” मग बलाम बालाकाच्या सरदारांबरोबर गेला.


बालाक बलामाला म्हणाला, “मी तुला मोठ्या निकडीचे बोलावणे पाठवले होते ना? माझ्याकडे का नाही आलास? तुला साजेसा सन्मान करण्यास मी समर्थ नाही काय?”


तेथील बंधुजन आमच्याविषयी ऐकून अप्पियाची पेठ व तीन उतारशाळा येथपर्यंत आम्हांला सामोरे आले; त्यांना पाहून पौलाने देवाची उपकारस्तुती करून धैर्य धरले.


‘उठा, कूच करून आर्णोन खोरे ओलांडून जा; पाहा, हेशबोनाचा अमोरी राजा सीहोन आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे; तो देश तू आपल्या ताब्यात घ्यायला लाग आणि त्याला लढाईला प्रवृत्त कर.


ह्या प्रकारे त्या वेळी यार्देनेच्या पूर्वेस राहणारे अमोर्‍यांचे दोन्ही राजे ह्यांच्या ताब्यातल्या आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा देश आपण घेतला;


त्यानंतर त्यांनी रानातून फिरत फिरत अदोम व मवाब ह्या देशांना वळसा घालून मवाबाच्या पूर्वेकडून येऊन आर्णोन नदीपलीकडे तळ दिला. पण ते मवाबाच्या हद्दीत शिरले नाहीत; कारण आर्णोन नदी ही मवाबांची सरहद्द होती.


त्याने होमाची समाप्ती केली तोच शमुवेल आला; तेव्हा शौल त्याला भेटून नमस्कार करायला बाहेर गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan