Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 21:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 कारण हेशबोनातून अग्नी निघाला आहे. सीहोनाच्या नगरातून ज्वाला निघाली आहे; तिने मवाबाचे आर, आणि आर्णोनेच्या गढ्यांचे स्वामी भस्म करून टाकले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 हेशबोनामधून आग निघाली आहे, ज्वाला सीहोनाच्या शहरातून निघाली आहे. त्या आगीत मवाबामधले आर शहर बेचीराख झाले. आणि आर्णोनेच्या गढ्याचे स्वामी भस्म करून टाकले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 “हेशबोनमधून अग्नी निघाला, सीहोनाच्या शहरातून ज्वाला निघाली. त्याने मोआबचे आर या आर्णोनाच्या उंच प्रदेशातील नागरिकांना भस्म केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 21:28
20 Iomraidhean Croise  

अग्नीने त्यांचे कुमार खाऊन टाकले; त्यांच्या कुमारींना लग्नगीते लाभली नाहीत.


ह्यास्तव प्रभू, सेनाधीश प्रभू, त्याच्या पुष्ट जनांना रोडपणा आणील; त्याच्या वैभवाखाली, अग्निज्वालेसारखी ज्वाला भडकेल.


हेशबोन व एलाले ही ओरडत आहेत, याहसापर्यंत त्यांचा आक्रोश ऐकू जात आहे; ह्यास्तव मवाबाचे हत्यारबंद लोक आरोळ्या देत आहेत; त्यांचा जीव घाबरा झाला आहे;


मवाब देवदर्शन घेईल आणि उंच स्थानी रडून-रडून थकेल; तो देवघरात प्रार्थना करण्यास जाईल तरी त्याचे काही चालणार नाही.


तर मी सोराच्या तटावर अग्नी पाठवीन, तो त्याचे महाल जाळून भस्म करील.”


ह्यामुळे मी तेमानावर अग्नी पाठवीन, तो बस्राचे महाल जाळून भस्म करील.”


तर मी राब्बाच्या कोटात अग्नी पेटवीन, वधाच्या दिवशी रणशब्द होत असता व वावटळीच्या दिवशी तुफान होत असता तो तिचे महाल जाळून भस्म करील.


पण मी हजाएलाच्या घरावर अग्नी पाठवीन; तो बेन-हदाद ह्याचे महाल जाळून भस्म करील.


तर मी गज्जाच्या तटावर अग्नी पाठवीन तो त्याचे महाल जाळून भस्म करील.


त्यामुळे मी मवाबावर अग्नी पाठवीन, तो करियोथाचे महाल जाळून भस्म करील व त्या दंगलीत रणशब्द व शिंगाचा आवाज होत असता, मवाब नष्ट होईल;


त्यामुळे मी यहूदावर अग्नी पाठवीन, तो यरुशलेमेचे महाल जाळून भस्म करील.”


आणि आर येथील वस्तीपर्यंत व मवाबाच्या सरहद्दीपर्यंत पसरत गेलेली त्या खोर्‍यांची उतरण.”


ह्यावरून शाहीर गातात की, “हेशबोनाला या; सीहोनाचे नगर बांधू द्या, त्याची स्थापना होऊ द्या;


सकाळी बालाक बलामाला बामोथ-बआलाच्या उंच स्थानी घेऊन गेला व तेथून त्याने इस्राएल लोकांचा जवळचा पसारा पाहिला.


‘आज आर येथून मवाबाची सरहद्द ओलांडून तुला पलीकडे गेले पाहिजे;


तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘मवाबाला उपद्रव देऊ नकोस व त्यांच्याशी युद्धाचा प्रसंग आणू नकोस; मी त्यांच्या देशाचा कोणताही भाग तुला वतन म्हणून देणार नाही, कारण मी लोटाच्या वंशजांना आर नगर वतन म्हणून दिले आहे.’


ते काटेरी झुडूप झाडांना म्हणाले, ‘तुम्ही खरोखर मला अभिषेक करून तुमच्यावर राजा नेमणार असलात तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या, नाहीतर काटेरी झुडपातून अग्नी निघून तो लबानोनाचे गंधसरू भस्म करील.’


नाहीतर अबीमलेखातून अग्नी निघून शखेम व बेथ-मिल्लो येथील लोकांना भस्म करो; आणि शखेम व बेथ-मिल्लो येथील लोकांतून अग्नी निघून अबीमलेखाला भस्म करो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan