Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 21:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 हेशबोन हे अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याचे नगर होते; त्याने मवाबाच्या पूर्वीच्या राजाशी लढाई करून आर्णोनेपर्यंतचा त्याचा सर्व देश काबीज केला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 हेशबोनामध्ये अमोऱ्यांचा राजा सीहोन राहत होता. पूर्वी सीहोनाने मवाबाच्या राजाशी युद्ध केले होते. सीहोनाने आर्णोन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 हेशबोन हे अमोर्‍यांचा राजा सीहोनचे शहर होते, ज्याने मोआबाच्या पूर्वीच्या राजाशी युद्ध केले होते आणि आर्णोन पर्यंतचा सर्व प्रदेश त्याच्याकडून घेतला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 21:26
13 Iomraidhean Croise  

तुझा कंठ हस्तदंती मनोर्‍यासारखा आहे; तुझे नेत्र बाथ-रब्बीमच्या वेशीजवळील हेशबोनच्या कुंडांसारखे आहेत; तुझे नाक दिमिष्कासमोरील लबानोनाच्या बुरुजासारखे आहे.


तुझा शिरोभाग कर्मेलासारखा आहे; तुझ्या डोक्याचे केस जांभळ्या वस्त्रासारखे आहेत; तुझ्या केशपाशात राजा बद्ध आहे.


मवाबकन्येची कीर्ती नाहीशी झाली आहे. हेशबोनात तिच्याविरुद्ध कट करीत आहेत : ते म्हणतात, ‘चला, आपण तिचे राष्ट्रत्व मोडून टाकू.’ हे मदमेना, तू सामसूम होशील; तुझ्यामागे तलवार लागेल.


मवाब फजीत झाला; हायहाय करा, रडा; मवाब ओसाड झाला आहे, हे आर्णोनात सांगा.


पळून जाणारे हेशबोनाच्या छायेत निर्बल होऊन राहत आहेत; कारण हेशबोनातून अग्नी, सीहोनातून ज्वाला निघून मवाबाच्या सीमा व दंगेखोरांची माथी खाऊन टाकत आहे.


ह्याप्रमाणे इस्राएलाने अमोर्‍यांची ही सर्व नगरे घेतली. अमोर्‍यांच्या सर्व नगरांत म्हणजे हेशबोनात व आसपासच्या गावांत इस्राएल वस्ती करून राहिला.


ह्यावरून शाहीर गातात की, “हेशबोनाला या; सीहोनाचे नगर बांधू द्या, त्याची स्थापना होऊ द्या;


मोशेने हेशबोनात राहणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याला, आणि एद्रई येथे अष्ठरोथ येथील बाशानाचा राजा ओग ह्याला ठार मारल्यावर,


त्यांचा मुलुख म्हणजे आर्णोन खोर्‍याच्या सीमेवरील अरोएर व खोर्‍यामधले नगर येथपासून मेदबापर्यंतचे पठार,


हेशबोन व पठारावरली त्याची सर्व नगरे, दीबोन, बामोथ-बाल, बेथ-बाल-मोन;


त्यांचा मुलुख म्हणजे याजेर, गिलादातली सर्व नगरे आणि राब्बाच्या पूर्वेकडील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा प्रदेश.


हेशबोन व त्याचे गायरान आणि याजेर व त्याचे गायरान अशी एकंदर चार नगरे दिली.


हेशबोन व त्याची उपनगरे, अरोएर व त्याची उपनगरे आणि आर्णोनतीरीची सर्व नगरे ह्यांत आज तीनशे वर्षे इस्राएल वस्ती करून आहे, तर ह्या अवधीत तुम्ही ती परत का मिळवली नाहीत?


Lean sinn:

Sanasan


Sanasan