Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 21:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तेव्हा इस्राएलाने त्याच्यावर तलवार चालवली आणि आर्णोनेपासून अम्मोनी लोकांच्या सरहद्दीवरील यब्बोक नदीपर्यंत त्याचा देश काबीज केला; परंतु अम्मोनी लोकांची सरहद्द मजबूत होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 पण इस्राएलानी त्याच्यावर तलवार चालविली. नंतर त्यांनी आर्णोन आणि यब्बोक नद्यांच्या मधला प्रदेश घेतला. त्यांनी अम्मोनी लोकांच्या सरहद्दीपर्यंतचा प्रदेश घेतला, ते त्या सरहद्दीवर थांबले कारण अम्मोनी लोक तिचे रक्षण करीत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 परंतु इस्राएलने त्याला तलवारीवर धरले आणि आर्णोन नदीपासून यब्बोक नदीपर्यंत, अम्मोनी लोक राहतात तिथपर्यंत त्यांच्या देशावर कब्जा केला, कारण त्यांची सीमा तटबंदची होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 21:24
24 Iomraidhean Croise  

मग तो रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि आपली अकरा मुले ह्यांना बरोबर घेऊन यब्बोक नदीच्या उताराने पार गेला.


मग तू त्यांना देशोदेशीचे लोक अंकित करून दिले आणि त्यांच्या चतुःसीमा नेमून दिल्या, त्याप्रमाणेच हेशबोनचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग ह्या दोघांच्या देशांचे वतन त्यांना प्राप्त झाले.


ज्याने अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याला ठार मारले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.


मी तर त्यांच्यापुढून अमोरी लोकांचा संहार केला; त्यांची उंची गंधसरूच्या उंचीसारखी होती. ते अल्लोन झाडांसारखे मजबूत होते; मी वरून त्यांचे फळ व खालून त्यांचे मूळ नासवले.


तेथून निघून त्यांनी रानातून वाहणारी, अमोर्‍यांच्या सीमेवरून वाहणारी जी आर्णोन नदी तिच्या पैलतीरी तळ दिला. ही आर्णोन नदी मबाव देशाची सरहद्द आहे. ती मवाबी व अमोरी ह्यांच्यामधील सरहद्दीवरून वाहते.


मोशेने हेशबोनात राहणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याला, आणि एद्रई येथे अष्ठरोथ येथील बाशानाचा राजा ओग ह्याला ठार मारल्यावर,


तुम्ही ह्या स्थानी आल्यावर हेशबोनाचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग आपणांबरोबर सामना करण्यास समोर आले, तेव्हा आपण त्यांचा मोड केला;


रऊबेनी व गादी ह्यांना गिलादापासून आर्णोन खोर्‍यापर्यंतचा प्रदेश मी दिला त्या खोर्‍याच्या मध्य भागापर्यंत आणि अम्मोन्यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्यांची सरहद्द ठरवली.


परमेश्वराने अमोर्‍यांचे राजे सीहोन व ओग ह्यांचा व त्यांच्या प्रदेशाचा संहार केला तसाच ह्यांचाही करील.


मिसर देशातून बाहेर आल्यावर मोशे आणि इस्राएल लोकांनी जो हेशबोननिवासी अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याला पराजित केले, त्याच्या देशात यार्देनेच्या पूर्वेस बेथपौराच्या समोरील खोर्‍यात हे सांगण्यात आले;


म्हणजे रेफाईतला एकटाच वाचलेला अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करणारा बाशानाचा ओग ह्याचे सारे राज्य; ह्यांचा मोशेने मोड करून त्यांना हाकून लावले होते.


मग मी तुम्हांला यार्देनेच्या पूर्वेस राहणार्‍या अमोरी लोकांच्या देशात आणले; ते तुमच्याशी लढले; मी त्यांना तुमच्या हाती दिले व तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला; तुमच्यापुढून मी त्यांचा संहार केला.


आणि यार्देनेच्या पलीकडील अमोर्‍यांचे दोन राजे, हेशबोनाचा राजा सीहोन आणि अष्टारोथनिवासी बाशानाचा राजा ओग, ह्या दोघांचे त्याने काय केले हेही आम्ही जाणून आहोत.


तेव्हा परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला मिसरी, अमोरी, अम्मोनी व पलिष्टी ह्यांच्या तावडीतून सोडवले;


अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या जासुदांना म्हटले, “इस्राएल लोक मिसर देशाहून आले तेव्हा आर्णोन नदीपासून यब्बोक व यार्देन ह्या नद्यांपर्यंतचा माझा प्रदेश त्यांनी हिरावून घेतला; आता तो मुकाट्याने परत करा.”


त्यांनी विचारपूस केली, “मिस्पा येथे परमेश्वरासमोर आले नव्हते असे इस्राएल वंशांतले कोण आहेत?” तेव्हा त्यांना कळले की, याबेश-गिलादाहून त्या मेळाव्यास हजर राहण्यासाठी कोणीही छावणीत आले नव्हते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan