गणना 21:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 पण सीहोनाने इस्राएलास आपल्या देशातून जाऊ दिले नाही. आपले सर्व लोक जमा करून इस्राएलाशी सामना करण्यासाठी तो निघाला आणि रानाकडे आला; त्याने याहस येथे येऊन इस्राएलाशी लढाई केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पण सीहोन राजाने इस्राएल लोकांस त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. राजाने आपले सैन्य गोळा केले आणि तो रानाकडे कूच करीत निघाला. तो इस्राएल लोकांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला होता. याहसला राजाच्या सैन्याने इस्राएल लोकांशी युद्ध केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 परंतु सीहोन राजाने इस्राएलास त्याच्या सीमेमधून जाण्यास परवानगी दिली नाही. त्याने आपल्या संपूर्ण सैन्याला जमा केले व इस्राएला विरुद्ध बाहेर रानात गेला आणि याहस येथे पोहोचल्यावर तो इस्राएलाशी लढला. Faic an caibideil |