Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 21:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा इस्राएलाने परमेश्वराला असा नवस केला की, “जर तू खरोखर ह्या लोकांना माझ्या हाती देशील तर मी त्यांच्या नगरांचा समूळ नाश करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 नंतर इस्राएल लोकांनी परमेश्वरास खास वचन दिले, परमेश्वरा या लोकांचा पराभव करायला आम्हास मदत कर. जर तू हे केले तर आम्ही तुला त्यांची शहरे देऊ. आम्ही त्यांचा संपूर्ण नाश करु.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तेव्हा इस्राएलने याहवेहपुढे ही शपथ घेतली: “जर तुम्ही या लोकांना आमच्या हाती दिले तर आम्ही त्यांची शहरे पूर्णपणे नाश करू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 21:2
15 Iomraidhean Croise  

याकोबाने असा नवस केला की, “देव माझ्याबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तिच्यात माझे संरक्षण करील आणि मला खायला अन्न व ल्यायला वस्त्र देईल,


परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन.


त्याने परमेश्वराजवळ शपथ वाहिली, याकोबाच्या समर्थ देवाला नवस केला की,


जर कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करत नसेल, तर तो शापभ्रष्ट असो. माराना था.1


तर तू त्या नगराच्या रहिवाशांना तलवारीने अवश्य मारून टाकावेस, आणि त्या नगराचा व त्यातील सर्व वस्तूंचा समूळ नाश करावास आणि सर्व प्राणिमात्राचा तलवारीने संहार करावास.


तू त्या नगरातील सर्व लूट चवाठ्यावर जमा करावीस, आणि ते नगर त्यातल्या लुटीसह आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ सर्वस्वी जाळून नष्ट करावेस; त्याचा ढिगार कायमचा तसाच पडू द्यावास; ते पुन्हा वसवू नयेस.


पण तुझा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांची जी नगरे तुला वतन म्हणून देत आहे त्यांतला कोणताही प्राणी जिवंत ठेवू नकोस.


आणि तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील व तू त्यांचा पराभव करशील, तेव्हा त्यांचा समूळ नाश कर; त्यांच्याशी करारमदार करू नकोस व त्यांच्यावर दया करू नकोस.


हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे, मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्याबरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते.


त्या समयी यहोशवाने असा शाप दिला की, “जो कोणी यरीहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.”


इफ्ताहाने परमेश्वराला असा नवस केला की, “तू खात्रीने अम्मोनी लोकांना माझ्या हाती दिलेस,


ती म्हणाली, “हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस,आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर त्याच्या आयुष्यभरासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन; आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही;” असा तिने नवस केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan