Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 20:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 “आपली काठी घे. तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा. त्यांच्यादेखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा म्हणजे त्यातून पाणी निघेल; ह्याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ. ह्या मंडळीला व त्यांच्या जनावरांना पाज.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तुझी काठी घे. तुझा भाऊ अहरोन याला आणि त्या लोकांस बरोबर घे आणि खडकाजवळ जा. लोकांसमोर खडकाशी बोल. नंतर त्या खडकातून पाणी वाहू लागेल आणि तू ते पाणी त्या लोकांस आणि त्यांच्या जनावराना देऊ शकशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मंडळीला एकत्र करा. त्यांच्यासमोर खडकाशी बोल आणि त्यातून पाणी निघेल. तू त्या खडकातून समुदायासाठी पाणी काढशील म्हणजे ते व त्यांचे कळप पाणी पितील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 20:8
31 Iomraidhean Croise  

परमेश्वराला काही असाध्य आहे काय? नेमलेल्या समयी वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईन तेव्हा सारेला मुलगा होईल.”


आणि त्यांची क्षुधा भागवण्यासाठी तू आकाशातून त्यांना अन्न दिले, त्यांची तृषा शमवण्यासाठी खडकातून पाणी काढले आणि त्यांना अशी आज्ञा केली की जो देश तुम्हांला देण्यासाठी मी बाहू उभारून आणभाक केली आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तुम्ही त्यात जा.


त्याने खडक फोडला तेव्हा पाणी निघाले; ते नदीप्रमाणे रुक्ष प्रदेशातून वाहू लागले.


तो खडक पालटून पाण्याचे तळे करतो, गारेचा खडक पालटून पाण्याचा झरा करतो.


कारण तो बोलला आणि अवघे झाले; त्याने आज्ञा केली आणि सर्वकाही स्थिर झाले.


तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे दोन भाग कर म्हणजे इस्राएल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील;


तेव्हा मोशेने यहोशवाला सांगितले, “आपल्यांतले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर; उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन.”


तू आपल्या हातात ही काठी घे; हिने तू चिन्हे करून दाखवशील.”


तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझ्या हातात ते काय आहे?” तो म्हणाला, “काठी आहे.”


मग मोशे आपली बायको व मुलगे ह्यांना गाढवावर बसवून मिसर देशास परत जायला निघाला. तो देवाची काठी आपल्या हातात घेऊन चालला.


तेव्हा मोशे व अहरोन ह्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; त्याने काठी उचलून फारोच्या व त्याच्या सेवकांच्या समक्ष पाण्यावर मारली तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त बनले.


वनपशू, कोल्हे व शहामृग माझे स्तवन करतील; कारण मी आपल्या लोकांना, आपल्या निवडलेल्यांना, पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार;


त्यांना त्याने रुक्ष भूमीवरून नेले, तेथे त्यांना तहान लागली नाही; त्यांच्यासाठी त्याने खडकातून पाणी वाहवले; त्याने खडक फोडला तो पाणी खळखळा वाहिले.


मग मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले, आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली.


परमेश्वर मोशेला म्हणाला,


आणि आर येथील वस्तीपर्यंत व मवाबाच्या सरहद्दीपर्यंत पसरत गेलेली त्या खोर्‍यांची उतरण.”


राजदंडाने1 व आपल्या काठ्यांनी सरदारांनी ही विहीर खणली इस्राएलातील अमिरांनी ती खोदली.” मग ते रानातून मत्तनाला गेले;


येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल, इतकेच नाही, तर ह्या डोंगरालाही ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’ असे म्हणाल तर तसे होईल.


तुम्ही वाईट असताही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?”


तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.


हे सर्व जण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना व विनंती करण्यात तत्पर असत.


तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला; लगेच लोकांनी आपापल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन ते हस्तगत केले.


रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.”


नंतर त्याने देवाच्या व कोकर्‍याच्या राजासनातून ‘निघालेली’ नगरीच्या मार्गावरून वाहणारी ‘जीवनाच्या पाण्याची’ स्फटिकासारखी नितळ ‘नदी’ मला दाखवली.


आत्मा व वधू म्हणतात, “ये,” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan