Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 20:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 “अहरोन आता आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेल; जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यात त्याचा प्रवेश होणार नाही; कारण तुम्ही मरीबाच्या पाण्याजवळ माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून बंड केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 अहरोन आता आपल्या पूर्वजांस जाऊन मिळेल. मी इस्राएल लोकांस ज्या प्रदेशात नेण्याचे वचन दिले होते त्यामध्ये त्याचा प्रवेश होणार नाही. कारण तुम्ही मी मरीबाच्या पाण्याजवळ दिलेल्या आज्ञांचे उल्लघन करून बंड केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 “अहरोन आपल्या लोकांशी जाऊन मिळेल. इस्राएली लोकांना मी जो देश देत आहे त्यात तो प्रवेश करणार नाही, कारण मरीबाहच्या पाण्याकडे तुम्ही दोघांनी माझ्या आज्ञेविरुद्ध बंड केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 20:24
18 Iomraidhean Croise  

तू तर शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील; चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठमाती देतील.


इश्माएलच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस झाल्यावर तो मरण पावला व आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला.


अब्राहाम पुर्‍या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला.


मग त्याने प्राण सोडला; तो वृद्ध व पुर्‍या वयाचा होऊन मृत्यू पावला आणि स्वजनांस जाऊन मिळाला; त्याचे मुलगे एसाव आणि याकोब ह्यांनी त्याला मूठमाती दिली.


मग त्याने त्यांना आज्ञा केली की, “मी आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेन तेव्हा मला एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातल्या गुहेत माझ्या वडिलांजवळ पुरा.


आपल्या मुलांना आज्ञा करण्याचे संपवल्यावर याकोबाने पलंगावर आपले पाय घेतले व प्राण सोडला आणि तो आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला.


पाहा, मी तुला तुझ्या पितरांशी मिळवीन; तुला तुझ्या कबरेत शांतीने पोचवतील; जो गहजब मी ह्या स्थळावर व येथल्या रहिवाशांवर आणणार आहे तो तू आपल्या डोळ्यांनी पाहणार नाहीस.” त्यांनी परत येऊन राजाला हे कळवले.


मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा2 आणि मरीबा3 असे ठेवले, कारण इस्राएल लोकांनी तेथे कलह केला आणि “परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही” असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली. अमालेकाबरोबर युद्ध


आणि अहरोनाची वस्त्रे उतरवून त्याचा मुलगा एलाजार ह्याला घाल; मग अहरोन तेथे मृत्यू पावेल आणि आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेल.”


मिसर देश सोडायला लावून आम्हांला ह्या भिकार ठिकाणी का आणले? येथे धान्य, अंजीर, द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच, पण प्यायला पाणीसुद्धा नाही.”


तो पाहिल्यावर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला, त्याप्रमाणे तूही आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील.


“इस्राएल लोकांच्या वतीने मिद्यान्यांचा सूड घे; त्यानंतर तू आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील.”


गेर्षोनी पुरुषांनी आपली सर्व कामगिरी अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या आज्ञेप्रमाणे पार पाडावी. त्यांना जे काही वाहून न्यायचे व जी काही सेवा करायची त्या सगळ्याचा भार तुम्ही त्यांच्यावर सोपवावा.


तुझा भाऊ अहरोन हा होर डोंगरावर मृत्यू पावून स्वजनांस मिळाला, तसाच तूही ह्या डोंगरावर चढून जाशील व तेथे मृत्यू पावून स्वजनांस मिळशील.


मग लेवीविषयी तो म्हणाला, ‘तुझे थुम्मीम व उरीम तुझ्या भक्ताजवळ राहोत;’ त्याला तू मस्सा येथे पारखले, मरीबाच्या झर्‍याजवळ तू त्याच्याशी झुंजलास;


आणि त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हांला दिला आहे. आम्हांला तुमची दहशत बसली आहे, आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला ठाऊक आहे;


ती सर्व पिढी पूर्वजांस मिळाल्यानंतर जी नवी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कार्याची ओळख राहिली नव्हती. इस्राएलांची नीतिभ्रष्टता व शास्त्यांचा अंमल


Lean sinn:

Sanasan


Sanasan