Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 20:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तरीपण तो म्हणाला, “तू जायचेच नाहीस.” मग अदोम त्यांच्याशी सामना करण्यासाठी मोठ्या सैन्यानिशी सशस्त्र बाहेर पडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 पण अदोमाने पुन्हा उत्तर दिले, आम्ही तुम्हास आमच्या देशातून जाण्याची परवानगी देणार नाही. नंतर अदोमाच्या राजाने मोठी आणि शक्तीशाली सेना गोळा केली आणि तो इस्राएल लोकांशी लढावयास गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 त्यांनी पुन्हा उत्तर दिले: “तुम्ही जाऊ शकत नाही.” तेव्हा एदोम मोठे व सामर्थ्यवान सैन्य घेऊन त्यांच्याविरुद्ध बाहेर आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 20:20
10 Iomraidhean Croise  

याकोबाला आपल्या बापाने आशीर्वाद दिला त्यामुळे एसावाने त्याच्याशी वैर धरले; एसावाने आपल्या मनात म्हटले, “माझ्या बापाचे सुतक धरण्याचे दिवस जवळ आले आहेत; त्यानंतर मी आपला भाऊ याकोब ह्याला जिवे मारीन.


जासुदांनी परत येऊन याकोबाला सांगितले, “आम्ही आपला भाऊ एसाव ह्याला जाऊन भेटलो; तो आपल्याला भेटायला येत आहे, त्याच्याबरोबर चारशे माणसे आहेत.”


मी शांतताप्रिय आहे, तरी मी बोलतो तेव्हा ते लढाईस प्रवृत्त होतात.


परमेश्वर म्हणतो, “अदोमाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; त्याने तलवार घेऊन आपल्या बंधूचा पाठलाग केला, त्याने आपला कळवळा दाबून टाकला, तो आपल्या क्रोधाने एकसारखा भडकत राहिला; त्याने आपला संताप सतत बाळगला.


पण अदोमाने उत्तर दिले, “माझ्या देशातून तू जायचे नाहीस; जाशील तर मी तलवार घेऊन तुझ्याशी सामना करायला येईन.”


ह्याप्रमाणे इस्राएल लोकांना अदोमाने आपल्या हद्दीतून जाऊ देण्याचे नाकारले, तेव्हा इस्राएल लोक तेथून दुसरीकडे वळले.


तेव्हा त्यांनी जासुदांच्या हाती अदोमाच्या राजाला सांगून पाठवले की, कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून जाऊ दे; पण अदोमाच्या राजाने आमचे ऐकले नाही; तसेच त्यांनी मवाबाच्या राजाला सांगून पाठवले, पण तोही आमचे ऐकायला तयार नव्हता, म्हणून इस्राएल कादेश येथे वस्ती करून राहिले.


पण सीहोनाला इस्राएलाची खात्री नसल्यामुळे त्याने त्याला आपल्या हद्दीतून जाऊ दिले नाही; उलट त्याने आपले सर्व लोक जमवून याहस येथे तळ देऊन इस्राएलाशी युद्ध केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan