Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 20:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 ह्यावर परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना म्हटले, “तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, इस्राएल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रकट केले नाही, म्हणून ह्या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात ह्यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. इस्राएली लोकांपुढे तुम्ही माझे पावित्र्य राखले नाही. मी वचन दिल्याप्रमाणे या मंडळीला जो देश दिला आहे ह्याना त्या देशात तुम्ही त्यांना तिथे घेऊन जाणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 परंतु याहवेह मोशे आणि अहरोन यांना म्हणाले, “कारण इस्राएली लोकांच्या दृष्टीत मी पवित्र असावे इतका सन्मान करण्याइतपत तुम्ही माझ्यावर पुरेसा विश्वास ठेवला नाही, मी जो देश त्यांना देऊ करीत आहे त्यात या समुदायाला तुम्ही आणणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 20:12
26 Iomraidhean Croise  

ते अगदी पहाटेस उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले; ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, “अहो यहूद्यांनो, अहो यरुशलेमनिवासी जनहो, ऐका; तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.”


मरीबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला, आणि त्यांच्यामुळे मोशेवर अरिष्ट आले;


हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस; तू त्यांना क्षमा करणारा असा देव होतास, तरी त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांना शासन करीत होतास.


एफ्राइमाचे शीर शोमरोन व शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र. तुम्ही भाव ठेवणार नाही तर तुमचा निभाव लागणार नाही.”’


तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना; त्याचेच भय व धाक धरा.


मी तुम्हांला राष्ट्रांतून बाहेर आणीन व ज्या देशांत तुमची पांगापांग झाली आहे त्यांतून तुम्हांला जमा करीन, तेव्हा मी सुगंधाप्रमाणे तुमचा स्वीकार करीन आणि तुमच्या ठायी माझी पवित्रता विदेशी राष्ट्रांना प्रकट होईल.


तुम्ही माझ्या थोर नामास राष्ट्रांसमोर बट्टा लावल्यामुळे त्या राष्ट्रांनी माझे नाम अपवित्र मानले, ते ती पवित्र मानतील असे मी करीन आणि त्या राष्ट्रांदेखत तुमच्या ठायी मला पवित्र मानतील तेव्हा राष्ट्रांना समजेल की मी परमेश्वर आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


प्रभू परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तुझ्या मनात कल्पना येतील आणि तू दुष्ट युक्ती योजशील.


ह्या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वराने सांगितले ते हे : जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझा गौरव होईल.” तेव्हा अहरोन चूप राहिला.


मला तू असेच वागवणार असलास तर मला एकदाचा मारून टाक; तुझी कृपादृष्टी माझ्यावर असली म्हणजे माझी दुर्दशा मला पाहावी लागणार नाही.”


“अहरोन आता आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेल; जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यात त्याचा प्रवेश होणार नाही; कारण तुम्ही मरीबाच्या पाण्याजवळ माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून बंड केले.


कारण त्सीन रानात मंडळीचे भांडण झाले त्या वेळी त्या झर्‍याजवळ त्यांच्यासमोर माझे पावित्र्य प्रकट करावे म्हणून जी माझी आज्ञा होती तिच्याविरुद्ध तुम्ही बंड केले.” (त्सीन रानातील कादेश येथील मरीबा नावाचा हा झरा.)


तेव्हा येशूने उत्तर दिले, “अरेरे, हे विश्वासहीन व कुटिल पिढी! मी कोठवर तुमच्याबरोबर राहावे? कोठवर तुमचे सोसावे? त्याला येथे माझ्याजवळ आणा.”


तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे; कारण मी तुम्हांला खचीत सांगतो की, जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला ‘इकडून तिकडे सरक’ असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल; तुम्हांला काहीच असाध्य होणार नाही.


पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही; कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”


जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल.”


कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले.


परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला;


तुमच्यामुळे माझ्यावरही परमेश्वर रागावून म्हणाला की, ‘तूही त्या देशात प्रवेश करणार नाहीस;


परमेश्वर त्याला म्हणाला, “ज्या देशाविषयी मी अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी शपथ वाहिली होती की, तो मी तुझ्या संतानांना देईन, तो देश हाच; तो मी तुला प्रत्यक्ष दाखवला आहे, पण नदी ओलांडून तिकडे तुला जायचे नाही.”


मग तुमच्यामुळे परमेश्वराने माझ्यावर रागावून अशी शपथ वाहिली की, तुला यार्देनेच्या पलीकडे जायचे नाही, व जो उत्तम देश इस्राएलाचा देव परमेश्वर त्यांना वतन म्हणून देत आहे त्यात तू प्रवेश करणार नाहीस;


“माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे; तर आता ऊठ; ह्यांना, अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा.


तर ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणून आपल्या अंत:करणात ‘पवित्र माना;’ आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणार्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या;


Lean sinn:

Sanasan


Sanasan