Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 20:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले, आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मग मोशेने आपला हात उगारला व आपल्या काठीने खडकावर दोनदा वार केला. तेव्हा पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला व समुदायाने आणि त्यांच्या कळपाने पाणी प्याले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 20:11
24 Iomraidhean Croise  

पूर्वीच्या प्रसंगी तुम्ही तो वाहून आणला नाही, आणि आपण आपला देव परमेश्वर ह्याला विधीप्रमाणे भजलो नाही म्हणून त्याने आपल्याला तडाखा दिला.”


दाविदाने सांगितले की, लेव्यांवाचून दुसर्‍या कोणीही देवाचा कोश उचलू नये; कारण देवाचा कोश उचलण्यास व देवाची सेवा निरंतर करण्यास त्यांना परमेश्वराने निवडले आहे.”


त्याने खडक फोडला तेव्हा पाणी निघाले; ते नदीप्रमाणे रुक्ष प्रदेशातून वाहू लागले.


तो खडक पालटून पाण्याचे तळे करतो, गारेचा खडक पालटून पाण्याचा झरा करतो.


तू झरा खोदून जलप्रवाह बाहेर काढलास; तू निरंतर वाहणार्‍या नद्या सुकवून टाकल्यास.


त्याने रानात खडक फोडून खोल जलाशयाप्रमाणे भरपूर पाणी त्यांना पिण्यास दिले.


त्याने खडकातून पाण्याचे झरेही काढले, नद्यांप्रमाणे पाणी वाहवले.


पाहा, त्याने खडकावर टोला मारला तेव्हा पाणी उसळून वाहू लागले, व त्याचे लोट चालले; तो भाकरही देण्यास समर्थ आहे काय? तो आपल्या लोकांना मांस पुरवील काय?”


पाहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन; आणि तू त्या खडकावर काठी आपट म्हणजे त्यातून पाणी निघेल आणि लोक ते पितील.” इस्राएलाच्या वडिलांच्या देखत मोशेने तसे केले.


पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आत्ताच ती उद्भवत आहे; तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन.


त्यांना त्याने रुक्ष भूमीवरून नेले, तेथे त्यांना तहान लागली नाही; त्यांच्यासाठी त्याने खडकातून पाणी वाहवले; त्याने खडक फोडला तो पाणी खळखळा वाहिले.


मी रानात, रखरखीत प्रदेशात तुला खाऊ घातले.


अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यांत अग्नी घातला व त्यांवर धूप घालून तो अनधिकृत अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती.


“आपली काठी घे. तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा. त्यांच्यादेखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा म्हणजे त्यातून पाणी निघेल; ह्याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ. ह्या मंडळीला व त्यांच्या जनावरांना पाज.”


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले. कारण ते आपल्यामागे चालणार्‍या आध्यात्मिक खडकातून पीत होते; तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या गोष्टींविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.


आग्या सापांनी व विंचवांनी व्यापलेल्या घोर व भयानक रानातून आणि रुक्ष व निर्जल भूमीतून त्याने तुला आणले; त्याने तुझ्यासाठी गारेच्या खडकातून पाणी काढले;


कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही.


तेव्हा परमेश्वराने लेही येथे एक खळगा फोडून उघडला आणि त्यातून पाणी वाहू लागले. ते पाणी पिऊन त्याच्या जिवात जीव आला व तो ताजातवाना झाला. ह्यावरून त्याचे नाव त्याने एन-हक्कोरे (धावा करणार्‍यांचा झरा) असे ठेवले. तो अद्याप लेहीत आहे.


असे असता तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाहीस? तू लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस?”


तेव्हा शौल शमुवेलाला म्हणाला, “मी पाप केले आहे; मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे; कारण मी लोकांना भिऊन त्यांचे म्हणणे ऐकले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan