Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 19:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 जर अशुद्ध झालेल्या कोणा माणसाने स्वतःला शुद्ध करून घेतले नाही तर मंडळीतून त्याचा उच्छेद व्हावा, कारण तो परमेश्वराचे पवित्रस्थान भ्रष्ट करणारा होय; अशौचक्षालनाचे पाणी त्याच्यावर टाकले नाही म्हणून तो अशुद्ध होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 एखादा मनुष्य अशुद्ध झाल्यानंतर पुन्हा शुद्ध झाला नाहीतर त्यास इस्राएल लोकांपासून वेगळे ठेवावे. कारण त्याने परमेश्वराचे पवित्र निवास मंडपही अशुद्ध करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 पण जे अशुद्ध आहेत आणि स्वतःला शुद्ध करीत नाहीत, त्यांना समाजातून काढून टाकले जावे, कारण त्यांनी याहवेहचे पवित्रस्थान विटाळविले आहे. शुद्धतेचे पाणी त्यांच्यावर शिंपडले गेले नाही आणि ते अशुद्ध आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 19:20
13 Iomraidhean Croise  

कोणाची सुंता झाली नाही, म्हणजे कोणा पुरुषाची अग्रत्वचा काढण्यात आली नाही, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा; त्याने माझा करार मोडला असे होईल.”


जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा कोणा परक्याला ते लावील त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”


ह्या प्रकारे तुम्ही इस्राएल लोकांना त्यांच्या अशुद्धतेपासून दूर ठेवावे म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले माझे निवासस्थान ते भ्रष्ट करणार नाहीत, आणि आपल्या अशुद्धावस्थेत मरायचे नाहीत.”


त्याने आपले कपडे धुतले नाहीत व आपले शरीर धुतले नाही, तर त्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी.”


अहरोनाच्या वंशापैकी कोणी महारोगी अथवा स्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत. मृतामुळे अशुद्ध झालेल्या मनुष्याला किंवा वीर्यपात झालेल्या पुरुषाला जो कोणी स्पर्श करील,


परंतु धिटाईने काही कृत्य करणारा मनुष्य, मग तो स्वदेशीय असो किंवा परदेशीय असो, तो परमेश्वराची निंदा करणारा समजावा; त्या मनुष्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.


कोणी मनुष्याच्या शवाला शिवला आणि त्याने स्वतःला शुद्ध केले नाही तर तो परमेश्वराचा निवासमंडप भ्रष्ट करणारा ठरेल; असल्या मनुष्याचा इस्राएल लोकांतून उच्छेद व्हावा; अशौचक्षालनाचे पाणी त्याच्यावर शिंपडले नसल्यामुळे तो अशुद्ध होय; त्याच्या ठायी त्याचे अशुद्धपण तसेच राहते.


परंतु एखादा मनुष्य शुद्ध असून व प्रवासात नसूनही त्याने वल्हांडण सण पाळण्याची हयगय केली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. नेमलेल्या समयी त्याने परमेश्वराला अर्पण आणले नाही म्हणून त्याच्या पापाची शिक्षा त्याने भोगावी.


जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल.


म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा,


दुराचारी माणूस दुराचार करत राहो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करत राहो; नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो; पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan