Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 19:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा : इस्राएल लोकांना सांग की, निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवले नाही अशी एक तांबड्या रंगाची कालवड माझ्याकडे घेऊन या;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वराने इस्राएल लोकांस जी शिकवण दिली तिचे हे नियम आहेत. निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवलेले नाही अशी एक लाल कालवड घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “याहवेहने आज्ञापिलेल्या कराराचा हा एक नियम आहे: इस्राएली लोकांस सांग की, जी अव्यंग किंवा निर्दोष आणि जिच्यावर कधीही जू घातले नाही अशी तांबड्या रंगाची कालवड त्यांनी तुमच्याकडे आणावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 19:2
21 Iomraidhean Croise  

कोकरू घ्यायचे ते निर्दोष असावे. तो एक वर्षाचा नर असावा; हा नर मेंढरांतला किंवा शेरडांतला, तुम्हांला वाटेल तो घ्यावा;


परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.


माझ्या अपराधांचे जू त्याने आपल्या हातांनी जखडले आहे; माझे अपराध एकत्र गुंफले आहेत; ते माझ्या मानेला लागले आहेत; त्याने माझे बळ खचवले आहे; ज्यांच्यापुढे मला उठता येत नाही अशांच्या हाती प्रभूने मला दिले आहे.


शेरडामेंढरांतले होमार्पण करायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा.


गुराढोरांतले होमार्पण अर्पायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापुढे अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल.


आणि जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड आणि एजोब1 हे घेऊन जिवंत पक्ष्यासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात त्याने बुडवावे;


परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला :


तेव्हा याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब व किरमिजी रंगाचे सूत घेऊन कालवड जळत असलेल्या अग्नीमध्ये टाकावे.


मग एलाजार याजक युद्धास गेलेल्या सैनिकांना म्हणाला, “परमेश्वराने मोशेला आज्ञापिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा होय :


देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.


मग जो गाव त्या प्रेताच्या सर्वांत जवळचा असेल त्यातल्या वडीलवर्गाने कामास कधी न लावलेली अथवा कधी न जुंपलेली अशी एक कालवड घ्यावी;


असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते; तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे.


खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांसह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत; ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.


तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने ‘तुम्ही मुक्त झाला आहात.’


त्याने पाप ‘केले नाही, आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही.’


आणि ‘विश्वसनीय साक्षी,’ मेलेल्यांमधून ‘प्रथम जन्मलेला’ व ‘पृथ्वीवरील राजांचा अधिपती’ येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांला कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकांतून मुक्त केले,’


तर आता तुम्ही एक नवी गाडी तयार करा; आणि ज्यांच्यावर अद्यापि जू ठेवले नाही अशा दोन दुभत्या गाई घेऊन गाडीस जुंपा आणि त्यांची वासरे त्यांच्यापासून घरी घेऊन जा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan