Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 18:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “पाहा, मला केलेली समर्पणे म्हणजे इस्राएल लोकांच्या पवित्र केलेल्या वस्तू तुला व तुझ्या वंशजांना तुमचा वाटा म्हणून दिल्या आहेत, तो तुमचा निरंतरचा हक्क होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 नंतर परमेश्वर अहरोनास म्हणाला, पाहा मला केलेली समर्पणे इस्राएलाच्या ज्या पवित्र भेटी मला देतात त्या सर्व मी तुला दिल्या आहेत. तू आणि तुझी मुले त्या वाटून घेऊ शकता. तो नेहमीच तुमचा हक्क होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याहवेह अहरोनाला म्हणाले, मला सादर केलेल्या अर्पणांवर मी स्वतः तुला प्रभारी नेमले आहे; सर्व पवित्र अर्पणे जी इस्राएली लोक मला देतात ती मी तुला व तुझ्या पुत्रांना तुमचा वाटा, तुमचा शाश्वत भाग म्हणून देत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 18:8
32 Iomraidhean Croise  

दोषार्पणे व पापार्पणे ह्यांचा पैसा येत असे तो मंदिरात जमा करत नसत; तो पैसा याजकांचा असे.


परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार याजक व लेवी ह्यांना मनापासून आपली कामे करता यावीत म्हणून त्यांचा भाग त्यांना द्यावा अशी आज्ञा त्याने यरुशलेमेत राहणार्‍या लोकांना केली.


ही आज्ञा कानी पडताच इस्राएल लोक धान्य, द्राक्षारस, तेल, मध आदिकरून भूमीचा प्रथमउपज आणि सगळ्या उत्पन्नाचा दशमांश सढळ हाताने देऊ लागले.


आणि अहरोन अथवा त्याचे मुलगे दर्शनमंडपात2 प्रवेश करतील व पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातील, तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावेत. नाहीतर त्यांना दोष लागून ते मरतील; अहरोनाला व त्याच्या पश्‍चात त्याच्या वंशाला हा नियम निरंतरचा आहे.


वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल ह्यांतले थोडे घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्त्रांवर, तसेच त्याच्याबरोबर त्याच्या मुलांवर व त्यांच्या वस्त्रांवरही शिंपडावे; अशाने तो व त्याची वस्त्रे आणि त्याच्याबरोबर त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे पवित्र होतील.


इस्राएल लोकांकडून मिळणारा अहरोनाचा व त्याच्या मुलांचा हा निरंतरचा हक्क आहे, कारण हे समर्पित केलेले दान आहे; हे इस्राएलांकडून त्यांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित केलेले दान होय.


अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्या पश्‍चात त्याच्या मुलांसाठी असावीत, म्हणजे ह्या वस्त्रांनिशी त्यांचा अभिषेक होऊन त्यांच्यावर संस्कार व्हावा.


अहरोनाला पवित्र वस्त्रे घाल व त्याला अभिषेक करून पवित्र कर, म्हणजे तो याजक ह्या नात्याने माझी सेवा करील.


त्यांच्या बापाला जसा अभिषेक करशील तसाच त्यांना कर, म्हणजे याजक ह्या नात्याने ते माझी सेवा करतील. हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल.”


त्या दिवशी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल” आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल.


आपल्या भावांमध्ये जो मुख्य याजक आहे, ज्याच्या मस्तकाला अभिषेकाच्या तेलाचा अभ्यंग झाला आहे आणि पवित्र वस्त्रे परिधान करण्यासाठी ज्याच्यावर संस्कार झाला आहे, त्याने आपल्या डोक्याचे केस सोडू नयेत व आपली वस्त्रे फाडू नयेत;


याजकाने ती अर्पणे प्रथमउपजाच्या भाकरी-बरोबर त्या दोन मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावीत; ही परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र असून याजकाच्या वाट्याची व्हावीत.


त्यातून जे उरेल ते अहरोनाने व त्याच्या मुलांनी खावे, ते त्यांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी खमिरावाचून खावे.


खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानांतील प्रत्येक पुरुषाला आहे; परमेश्वराच्या हव्यातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढ्या निरंतर चालू राहावा; ह्या हव्यास जो कोणी स्पर्श करील तो पवित्र आहे.”


“अहरोनाला अभिषेक होईल त्या दिवशी त्याने आपल्या मुलांसह परमेश्वराला जे अर्पण करायचे ते हे : एक दशांश एफा सपीठ नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे.


जो याजक पापबली अर्पण करील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी तो खावा.


ह्या प्रत्येक अर्पणातून परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित केलेला अंश म्हणून त्याने एकेक पोळी अर्पावी; तिच्यावर शांत्यर्पणाचे रक्त शिंपडणार्‍या याजकाचा हक्क आहे.


परमेश्वर मोशेला म्हणाला,


हा बली खाण्याचा हक्क याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे; तो पवित्र स्थळी खावा; तो परमपवित्र होय.


हे झाल्यावर मोशेने अभिषेकाचे थोडे तेल व वेदीवरील थोडे रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ही पवित्र केली.


ज्या परमपवित्र वस्तूंचा अग्नीत होम करायचा नाही त्यांपैकी तुझ्या वस्तू ह्या : इस्राएल लोकांच्या अर्पणांपैकी जी सर्व अन्नार्पणे, सर्व पापार्पणे आणि सर्व दोषार्पणे ते मला अर्पण करतील, ती तुझ्या व तुझ्या वंशजांप्रीत्यर्थ परमपवित्र होत.


ज्या पवित्र वस्तू इस्राएल लोक समर्पित केलेला अंश म्हणून याजकाकडे आणतात; त्या सर्व त्याच्याच आहेत.


मंदिरात सेवा करणारे मंदिरातले उत्पन्न खातात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?


तेव्हा जे स्थळ तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथेच मी तुम्हांला सांगतो त्या सगळ्या वस्तू आणा : आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करायची अर्पणे आणि तुम्ही परमेश्वराला कराल ते सर्व विशिष्ट नवस.


आणि तेथेच तुम्ही आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करायची अर्पणे, नवसाची अर्पणे, स्वसंतोषाची अर्पणे आणि आपल्या गुराढोरांचे व शेरडामेंढरांचे प्रथमवत्स आणावेत;


लेवीय याजकाला म्हणजे लेव्याच्या सर्व वंशाला इस्राएल लोकांबरोबर काही वाटा किंवा वतन मिळणार नाही; परमेश्वराला अर्पायची हव्ये व त्यांच्या हक्काचे असेल ते त्यांनी खावे.


मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर असे म्हण : ‘पवित्र केलेल्या वस्तू मी आपल्या घरातून काढल्या आहेत आणि तू मला दिलेल्या सर्व आज्ञांना अनुसरून त्या मी लेवी, उपरा, अनाथ व विधवा ह्यांना दिल्या आहेत; मी तुझ्या कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही किंवा त्या मी विसरलोही नाही.


तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.”


जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे.


तुमच्याविषयी म्हणायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुमच्यामध्ये राहतो, तेव्हा तुम्हांला कोणी शिकवण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक — तो सत्य आहे, खोटा नाही — तुम्हांला सर्व गोष्टींविषयी शिकवतो त्याप्रमाणे व त्याने तुम्हांला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan