गणना 18:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पण वेदीच्या संबंधात किंवा अंतरपटाच्या आतील सेवेच्या बाबतीत तू व तुझे मुलगे ह्यांनी आपले याजकपण सांभाळावे; तुम्ही सेवा करावी, कारण मी तुम्हांला दान म्हणून याजकपणाची ही सेवा दिली आहे; कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण अहरोन फक्त तू आणि तुझ्या मुलांनीच याजकाचे काम केले पाहिजे. वेदीजवळ फक्त तुम्हीच जाऊ शकता. पवित्रस्थानाच्या पडद्याआड फक्त तुम्हीच जाऊ शकता. मी तुला एक भेट देत आहे याजक म्हणून तू करावयाची सेवा. माझ्या पवित्र स्थानाजवळ दुसरा कोणी आला तर त्यास मारुन टाकले जाईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु वेदी व आतील पडद्यासंबंधी केवळ तू व तुझ्या पुत्रांनीच याजक म्हणून पवित्रस्थानातील पडद्यामागील आणि वेदीवरील पवित्र सेवा करावी. याजकपणाची सेवा मी तुला भेट म्हणून देत आहे. इतर कोणीही जे पवित्रस्थानाच्या जवळ येतील त्यांना जिवे मारावे.” Faic an caibideil |