Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 18:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मी स्वत: तुमच्या लेवी बांधवांना इस्राएल लोकांमधून घेतले आहे; दर्शनमंडपाची सेवा करण्यासाठी परमेश्वराला ते वाहिलेले असून मी तुम्हांला दान म्हणून ते दिले आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 इस्राएल मधल्या सर्व लोकांतून मीच लेवी वंशाच्या लोकांस निवडले. ते तुझ्यासाठी एक भेट आहे. त्या लोकांस मी तुला दिले. ते परमेश्वराची सेवा करतील आणि दर्शनमंडपामध्ये काम करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 इस्राएली लोकांतून सभामंडपातील सेवाकार्य करण्यासाठी, याहवेहसाठी समर्पित म्हणून लेवी वंशातील तुझे सोबती तुझ्यासाठी भेट म्हणून निवडले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 18:6
14 Iomraidhean Croise  

पाहा, ज्यांच्या ठायी प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो; पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल;


“पाहा, मी तुमच्याशी व तुमच्यामागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो;


आणि पाहा, मी स्वतः मिसर्‍यांची मने कठीण करीन. ते त्यांच्या पाठीस लागतील; आणि फारो, त्याची सर्व सेना, त्याचे रथ व त्याचे स्वार ह्यांच्याकडून मी आपला सन्मान पावेन.


आणि पाहा, त्याच्या जोडीला मी दानवंशीय अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याला नेमले आहे; एवढेच नव्हे तर जितके म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या ह्रदयात मी बुद्धी ठेवली आहे; ती ह्यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांनी तयार कराव्यात.


मी, केवळ मीच बोललो आहे; मी त्याला बोलावले आहे, त्याला आणले आहे. त्याचा आयुष्यक्रम सफल होईल.


“तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे; तू मर्त्य मनुष्याला, तृणवत मानवपुत्राला भितेस अशी तू कोण?


कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन; त्यांना मी हुडकीन.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर त्यांना म्हणतो, पाहा, मी, मीच पुष्ट पशू व रोड पशू ह्यांमध्ये निवाडा करीन.


“इस्राएलातल्या सर्व प्रथमजन्मलेल्यांच्या ऐवजी मी इस्राएल लोकांतून लेवी वंश घेतला आहे; लेवी वंशातील लोक माझेच आहेत;


कारण प्रथमजन्मलेले सर्व माझेच आहेत; ज्या दिवशी मिसर देशातील प्रथमजन्मलेले सर्व मी मारून टाकले त्याच दिवशी इस्राएल लोकांतील मनुष्यांपैकी आणि पशूंपैकी प्रथमजन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरवले; ते माझेच आहेत; मी परमेश्वर आहे.”


“इस्राएलांच्या सर्व प्रथमजन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी वंश आणि त्यांच्या पशूंच्या ऐवजी लेव्यांचे पशू घे; लेवी वंशातील लोक माझे आहेत; मी परमेश्वर आहे.


“अहरोन याजकाची सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांना आणून त्याच्यासमोर उभे कर.


लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या हवाली कर; इस्राएल लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan