Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 18:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तर लेव्यांनीच दर्शनमंडपाची सेवा करावी; त्यांना लोकांच्या अन्यायाचा दोष वाहावा लागेल. हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. लेव्यांना इस्राएल लोकांमध्ये काही वतन नसावे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 लेवीचे जे वंशज दर्शनमंडपामध्ये काम करतात ते त्याच्याविरुध्द केलेल्या पापाला जबाबदार असतील. हा नियम नेहमी अस्तीत्वात राहील. लेव्यांना इस्राएल लोकांमध्ये वतन नसावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 लेवी लोक सभामंडपामध्ये सेवा करतील आणि त्याविरोधात केलेल्या अपराधाची जबाबदारी ते स्वतः वाहतील. येणार्‍या पिढ्यांपर्यंत हा सर्वकाळचा नियम असेल. इस्राएलमध्ये त्यांना वतन मिळणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 18:23
10 Iomraidhean Croise  

साक्षपटासमोर असणार्‍या अंतरपटाबाहेर दर्शनमंडपात1 अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर उजळण्याची व्यवस्था ठेवावी; हा इस्राएल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


इस्राएल बहकून गेले तेव्हा जे लेवी माझ्यापासून दूर गेले व आपल्या मूर्तींच्या मागे लागून मला सोडून बहकले त्यांना आपल्या अधर्माचे प्रतिफळ भोगावे लागेल.


तेव्हा परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “पवित्रस्थानासंबंधीचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबर तुझ्या घराण्याला वाहावा लागेल; त्याचप्रमाणे याजकपदासंबंधीचा दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वाहावा लागेल.


परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “त्यांच्या जमिनीपैकी तुला काहीही वतन मिळणार नाही आणि त्यांच्यामध्ये तुला काही वाटाही मिळायचा नाही; इस्राएल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे.


त्यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय; अशौच-क्षालनाचे पाणी जो शिंपडील त्याने आपले कपडे धुवावेत आणि जो त्या अशौचक्षालनाच्या पाण्याला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.


लेव्यांपैकी एक महिन्याच्या व त्यापेक्षा अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली, ते तेवीस हजार भरले; इस्राएल लोकांबरोबर त्यांची गणती केली नव्हती; कारण त्यांना इस्राएल लोकांबरोबर वतन दिले नव्हते.


अहरोन व सर्व मंडळी त्यांना निवासमंडपाच्या सेवेसंबंधाने जी काही कामगिरी सोपवतील ती त्यांनी दर्शनमंडपासमोर पार पाडावी.


तुमच्या पिढ्यानपिढ्यासाठी तुमच्या सर्व वस्तीच्या ठिकाणी ह्या गोष्टी तुमच्या न्यायाचे विधी म्हणून नेमलेल्या आहेत.


ह्यामुळेच लेवीला त्याच्या भाऊबंदांबरोबर काही वाटा किंवा वतन मिळायचे नाही; तुझा देव परमेश्वर ह्याने त्याला सांगितल्याप्रमाणे परमेश्वरच त्याचे वतन आहे.


लेवी वंशाला मात्र मोशेने कोणतेही वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे त्याला वाहिलेली हव्ये ही त्यांचा वतनभाग होत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan