Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 18:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 येथून पुढे इस्राएल लोकांनी दर्शनमंडपाजवळ येऊ नये, आले तर त्यांना पाप लागून ते मरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 यापुढे इस्राएल लोकांनी कधीही दर्शनमंडपाजवळ जाता कामा नये. ते जर गेले त्यांना पाप लागेल व ते मरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 येथून पुढे इस्राएली लोकांनी सभामंडपाजवळ जाऊ नये, नाहीतर त्यांच्या पापाचा परिणाम त्यांना भोगावा लागेल व ते मरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 18:22
7 Iomraidhean Croise  

आणि अहरोन अथवा त्याचे मुलगे दर्शनमंडपात2 प्रवेश करतील व पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातील, तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावेत. नाहीतर त्यांना दोष लागून ते मरतील; अहरोनाला व त्याच्या पश्‍चात त्याच्या वंशाला हा नियम निरंतरचा आहे.


कोणी आपल्या चुलतीशी गमन केले तर त्याने आपल्या चुलत्याचीच काया उघडी केली असे होईल; ते आपल्या पापाची शिक्षा भोगून निःसंतान मरतील.


माझी आज्ञा त्यांनी पाळावी, नाहीतर त्या पापाबद्दल त्यांना शिक्षा भोगावी लागेल आणि आज्ञाभंग केल्यामुळे ते मरतील; त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.


पण वेदीच्या संबंधात किंवा अंतरपटाच्या आतील सेवेच्या बाबतीत तू व तुझे मुलगे ह्यांनी आपले याजकपण सांभाळावे; तुम्ही सेवा करावी, कारण मी तुम्हांला दान म्हणून याजकपणाची ही सेवा दिली आहे; कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे.”


अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची नेमणूक कर म्हणजे ते आपले याजकपण सांभाळतील; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.”


निवासमंडपासमोर पूर्वेकडे म्हणजे दर्शनमंडपासमोर उगवतीस जे डेरे ठोकायचे ते मोशे आणि अहरोन व त्यांचे मुलगे ह्यांचे असावेत; इस्राएल लोकांकरिता पवित्रस्थानाच्या रक्षणाची जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली होती, ती त्यांनी पार पाडावी; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan