Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 18:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 “लेवीचे वंशज दर्शनमंडपाची जी सेवा करतात तिच्याबद्दल इस्राएल लोकांकडून जे सगळे दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 लेवीचे वंशज दर्शनमंडपाची सेवा करतात तिच्याबद्दल इस्राएल लोकांकडून जे सर्व दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 लेवी वंश सभामंडपाची सेवा करताना जी कामे करतात त्याचा मोबदला म्हणून इस्राएलातून येणारा सर्व दशांश मी त्यांना त्यांचे वतन असे देत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 18:21
26 Iomraidhean Croise  

ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य!” तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा दहावा भाग दिला.


तुम्ही हंगामाच्या वेळी उत्पन्नाचा पाचवा हिस्सा फारोला द्यावा; बाकीचे चार हिस्से तुमच्या मालकीचे होतील; ते शेताच्या बियाणांसाठी आणि तुम्हांला, तुमच्या घरच्यांना आणि तुमच्या मुलाबाळांना खाण्यासाठी ठेवा.”


फारोला उत्पन्नाचा पाचवा हिस्सा द्यावा हा कायदा योसेफाने मिसर देशाच्या जमिनीस लावून दिला तो आजवर चालत आहे; मात्र याजकांच्या जमिनी फारोच्या झाल्या नाहीत.


लोक अर्पणे, दशमांश व वाहिलेल्या वस्तू प्रामाणिकपणे आणून पोचवू लागले; त्यांचा मुख्य अधिकारी कोनन्या नावाचा एक लेवी असून त्याचा दुय्यम त्याचा भाऊ शिमी हा होता.


आपले भाऊबंद व महाजन ह्यांच्याशी एकचित्त होऊन आणभाक केली की जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे ह्याच्या द्वारे देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही वागू आणि आमचा प्रभू परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञा, निर्णय व नियम लक्षपूर्वक पाळू; असे न केल्यास आम्हांला शाप लागो.


आणि आपण आपल्या मळलेल्या पिठाचा पहिला उंडा, समर्पित अंशाची अर्पणे, सर्व प्रकारच्या झाडांची फळे, द्राक्षारस व तेल हे याजकांकडे देवाच्या मंदिराच्या कोठड्यांत आणावे; आणि आपल्या जमिनीच्या उत्पन्नाचा दशमांश लेव्यांकडे न्यावा; कारण लेवी सर्व नगरांतून आमच्या शेतीच्या उत्पन्नाचा दशमांश घेत असतात.


लेवी दशमांश घेतील तेव्हा त्यांच्याबरोबर अहरोनाच्या वंशातला कोणी याजक असावा, आणि लेव्यांनी दशमांशाचा दशमांश आमच्या देवाच्या मंदिराच्या कोठड्यांत म्हणजे भांडारात पोचता करावा.


याजक व लेवी ह्यांचे ठरलेले वाटे नगरोनगरीच्या शेतांप्रमाणे गोळा करावेत म्हणून त्या दिवशी भांडारे, परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश, प्रथमफळे व दशमांश ह्यांच्या कोठड्यांवर लोक नेमण्यात आले; कारण याजक व लेवी हे हजर राहिल्याकारणाने यहूदास आनंद झाला होता.


जरूब्बाबेल व नहेम्या ह्यांच्या दिवसांत सर्व इस्राएल लोक गायकांना व द्वारपाळांना दर दिवसाचा शिधा देत असत; ते लेव्यांचे वाटे काढून ठेवत आणि लेवी अहरोनाच्या वंशजांचे वाटे काढून ठेवत.


मग सर्व यहूदी लोक धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे दशमांश भांडारात पावते करू लागले;


त्याने तोबियासाठी एक मोठी कोठडी तयार केली होती; त्या कोठडीत पूर्वी अन्नबलीची सामग्री, ऊद, पात्रे आणि लेवी, गायक व द्वारपाळ ह्यांना शास्त्राज्ञेप्रमाणे द्यायचे धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे दशमांश, व याजकांना द्यायची समर्पित अंशांची अर्पणे ही ठेवत असत.


लेव्यांबरोबर माझा करार कायम होण्यासाठी ही आज्ञा मी तुमच्याकडे पाठवली आहे हे तुम्हांला समजेल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही ह्याविषयी माझी प्रचिती पाहा.


मी स्वत: तुमच्या लेवी बांधवांना इस्राएल लोकांमधून घेतले आहे; दर्शनमंडपाची सेवा करण्यासाठी परमेश्वराला ते वाहिलेले असून मी तुम्हांला दान म्हणून ते दिले आहेत;


“अहरोन याजकाची सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांना आणून त्याच्यासमोर उभे कर.


युद्धास गेलेल्या योद्ध्याच्या हिश्शातून माणसे, गाईबैल, गाढवे व शेरडेमेंढरे ह्यांच्यापैकी प्रत्येक पाचशेमागे एक ह्याप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ कर म्हणून घ्यावा;


ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणार्‍याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा.


त्या सर्वांना अन्नाचा वाटा सारखा मिळावा; पितृधन विकून जे काही मिळेल ते त्याचे आहेच.


लेवीच्या संतानांपैकी, ज्यांना याजकपण मिळते त्यांना लोकांपासून, म्हणजे अब्राहामाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan