Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 17:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ज्या पुरुषाला मी निवडीन त्याच्या काठीला अंकुर फुटतील; इस्राएल लोक तुमच्याविरुद्ध कुरकुर करीत आहेत ते त्यांचे कुरकुरणे मी अशा रीतीने बंद करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 खरा याजक म्हणून मी एका मनुष्याची निवड करीन. मी कोणाची निवड केली ते तुला कळेल कारण त्याच्या काठीला पालवी फुटायला लागेल. याप्रमाणे मी इस्राएली तुझ्या आणि माझ्याविरूद्ध तक्रारी करतात ते बंद पाडीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 ज्या पुरुषाची मी निवड करेन त्याच्या काठीला अंकुर फुटेल आणि इस्राएली लोक तुमच्याविरुद्ध सातत्याने जी कुरकुर करतात त्यापासून मी स्वतःची सुटका करेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 17:5
21 Iomraidhean Croise  

तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला, आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले; धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.


ह्या सर्वांनी आपापल्या वंशावळींचा लेख ज्यांची वंशावळी नोंदली होती त्यांच्या वहीत शोधला पण त्यांना तो न मिळाल्यामुळे ते अशुद्ध ठरून याजकपदावरून भ्रष्ट झाले.


त्याने आपला सेवक मोशे व आपण निवडलेला अहरोन ह्यांना पाठवले.


आणि सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल, कारण परमेश्वराविरुद्ध तुम्ही कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे; आम्ही असे कोण की तुम्ही आमच्याविरुद्ध कुरकुर करावी?”


इशायाच्या बुंध्याला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल;


मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन; गर्विष्ठांचा दिमाख बंद करीन, जुलम्यांचा तोरा उतरवीन.


येणार्‍या दिवसांत याकोब मूळ धरील; इस्राएल फुलेल व त्याला फळे येतील; ते फळांनी भूपृष्ठ भरतील.


ह्यास्तव अग्नीची ज्वाला धसकट खाऊन टाकते व वाळलेल्या गवताचे अग्नीत भस्म होऊन जाते तसे त्यांचे मूळ कुजलेल्या पदार्थासारखे होईल; त्यांचा फुलवरा धुळीसारखा उडून जाईल; कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराचे नियमशास्त्र तुच्छ लेखले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे वचन अव्हेरले आहे.


ते तुझी घरे अग्नीने जाळतील आणि बहुत स्त्रियांदेखत तुला शासन करतील; ह्या प्रकारे तुझी शिंदळकी मी बंद करीन, आणि ह्यापुढे तू कोणाला वेतन देणार नाहीस.


अशी तुझी शिंदळकीची खोड, मिसर देशात तुला लागलेली व्यभिचाराची चट, मी मोडीन, म्हणजे तू त्यांच्याकडे पुन्हा ढुंकून पाहणार नाहीस व मिसर देशाचे स्मरण तू ह्यापुढे करणार नाहीस.


मी इस्राएलास दहिवरासारखा होईन; तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील.


निवासमंडप पुढे न्यायचा असेल तेव्हा लेव्यांनीच तो मोडावा; आणि तो उभा करताना लेव्यांनीच तो उभा करावा; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.


मग लोक संकटात सापडल्यासारखे कुरकुर करू लागले; ते परमेश्वराच्या कानी पडले. ते ऐकून परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेऊन छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले.


ह्यावरून तू व तुझे सर्व साथीदार परमेश्वराच्या विरुद्ध जमलेले आहात, हे स्पष्ट होते. अहरोन तो काय की तुम्ही त्याच्याविरुद्ध कुरकुर करावी?”


मग तो कोरह व त्याचे साथीदार ह्यांना म्हणाला, “परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखवील व त्यांना आपल्याजवळ येऊ देईल; ज्याला तो निवडील त्याला तो आपल्याजवळ येऊ देईल.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाची काठी साक्षपटासमोर परत ठेवून दे; ह्या बंडखोरांना ती चिन्ह म्हणून ठेवावी; अशाने ते माझ्याविरुद्ध जी कुरकुर करीत आहेत ती तू बंद करशील, म्हणजे ते मरायचे नाहीत.”


मोशेने इस्राएल लोकांना ही गोष्ट सांगितली व त्यांच्या सर्व सरदारांनी आपापल्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे प्रत्येकी एक काठी अशा एकंदर बारा काठ्या दिल्या; त्यांच्या काठ्यांमध्ये अहरोनाचीही काठी होती.


दुसर्‍या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तर लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे. तिला बदाम येऊन ते पिकले आहेत, असे त्याला दिसले.


त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका.


तेव्हा त्यांना तुम्ही सांगा की, यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभंगले; तो यार्देनेतून पलीकडे जात असताना तिच्या पाण्याचे दोन भाग झाले. अशा प्रकारे हे धोंडे इस्राएल लोकांसाठी कायमचे स्मारक होतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan