Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 17:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 लेवीच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही; कारण इस्राएलांच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रत्येक सरदाराची एकेक काठी घे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 “लेवीच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही. प्रत्येक वंश प्रमुखासाठी एकेक काठी असलीच पाहिजे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 लेवी वंशाच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण प्रत्येक पूर्वजांच्या गोत्राच्या पुढार्‍याची एक काठी असावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 17:3
10 Iomraidhean Croise  

लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या मुलांची नावे ही : गेर्षोन, कहाथ व मरारी; लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते.


अम्रामाने आपली आत्या योखबेद ही बायको केली; तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे झाले; अम्रामाचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते.


ह्या प्रकारे तुम्ही आपला जीव धोक्यात घातला आहे; कारण परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे मला पाठवून तुम्ही म्हटले की, ‘परमेश्वर आमचा देव ह्याची आमच्यासाठी प्रार्थना कर व परमेश्वर आमचा देव सांगेल ते सर्व आम्हांला कळव म्हणजे त्याप्रमाणे आम्ही करू.


“मानवपुत्रा, तू लाकडाचा एक ढलपा घेऊन त्यावर, ‘हा यहूदा व त्यांचे सोबती इस्राएल वंशज ह्यांचा,’ असे लिही; लाकडाचा दुसरा ढलपा घेऊन त्यावर, ‘हा योसेफाचा म्हणजे एफ्राईम व त्याचे सोबती सर्व इस्राएल घराणे ह्यांचा ढलपा,’ असे लिही.


“इस्राएल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे त्यांच्या सर्व सरदारांकडून प्रत्येकी एक अशा बारा काठ्या घे आणि प्रत्येक काठीवर त्याचे-त्याचे नाव लिही;


आणि दर्शनमंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुम्हांला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव.


तेव्हा परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “पवित्रस्थानासंबंधीचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबर तुझ्या घराण्याला वाहावा लागेल; त्याचप्रमाणे याजकपदासंबंधीचा दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वाहावा लागेल.


पण वेदीच्या संबंधात किंवा अंतरपटाच्या आतील सेवेच्या बाबतीत तू व तुझे मुलगे ह्यांनी आपले याजकपण सांभाळावे; तुम्ही सेवा करावी, कारण मी तुम्हांला दान म्हणून याजकपणाची ही सेवा दिली आहे; कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे.”


ज्या वेळी ती अडीचशे पुरुषांची टोळी अग्नीत भस्म होऊन मरण पावली त्या वेळी पृथ्वीने आपले तोंड उघडून कोरहाबरोबर त्यांनाही गिळून टाकले, व ते चिन्हादाखल झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan