गणना 16:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुम्ही परमेश्वराच्या निवासमंडपाची सेवा करावी आणि मंडळीची सेवा करण्यासाठी तिच्यासमोर उभे राहावे म्हणून परमेश्वराने तुम्हांला आपल्याजवळ येऊ दिले; ह्या कार्यासाठी इस्राएलाच्या देवाने तुम्हांला इस्राएल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले आहे हे काय थोडे झाले? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुमची निवड इस्राएलच्या देवाने केली आहे आणि तुम्हास खास दर्जा दिला आहे म्हणून तुम्ही आनंदी असायला हवे. तुम्ही इस्राएलच्या इतर लोकांपेक्षा वेगळे आहात. परमेश्वराने तुम्हास खास कामासाठी, इस्राएल लोकांस परमेश्वराची भक्ती करायला मदत व्हावी म्हणून त्याच्या पवित्र निवासमंडपात त्याच्याजवळ आणले. हे पुरेसे नाही का? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुम्ही याहवेहच्या निवासमंडपाची सेवा करावी, मंडळीपुढे राहून तिची सेवा करावी म्हणून इस्राएली लोकांच्या परमेश्वराने तुम्हाला इस्राएलच्या इतर लोकांमधून वेगळे केले आहे आणि आपल्याजवळ घेतले ते तुम्हाला पुरेसे नाही काय? Faic an caibideil |
जे लेवी सर्व इस्राएल लोकांना शिकवत असत व परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र झाले होते त्यांना त्याने सांगितले की, “इस्राएलाचा राजा दावीद ह्याचा पुत्र शलमोन ह्याने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा; ह्यापुढे तुम्हांला आपल्या खांद्यांवर बोजा वागवण्याची जरूरी नाही; तर आता तुम्ही आपला देव परमेश्वर व त्याची प्रजा इस्राएल ह्यांची सेवा करा.