Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 16:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरील अग्नी घाल व त्यावर धूप ठेवून ते ताबडतोब मंडळीकडे नेऊन त्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त कर, कारण परमेश्वराचा कोप भडकला असून मरीची साथ सुरू झाली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, तुझे तांब्याचे भांडे आणि थोडासा अग्नी वेदीवरुन घे. नंतर त्यावर धूप टाक. लवकर मंडळीकडे घेऊन जा आणि त्यांच्यासाठी प्रायश्चित कर. कारण. परमेश्वराचा कोप भडकला आहे; मरी सुरू झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, “त्वरा कर. एक धुपाटणे घे. वेदीवरील अग्नी त्यावर ठेव. त्यावर धूप टाक आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर. कारण याहवेहचा कोप त्यांच्यावर भडकला आहे आणि पीडा सुरू झाली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 16:46
23 Iomraidhean Croise  

सरूवेचा पुत्र यवाब हा गणती करू लागला, पण त्याने ते काम पूर्ण केले नाही; कारण त्यामुळे देवाचा कोप इस्राएलावर भडकला; ही गणती दावीद राजाच्या बखरीत लिहिलेली नाही.


त्यांनी आपल्या कृत्यांनी त्याला क्रोध आणला म्हणून त्यांच्यामध्ये पटकी सुरू झाली.


माझी प्रार्थना तुझ्यासमोर धूपाप्रमाणे माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो.


मोशेने अहरोन आणि त्याचे मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की, “तुम्ही आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नका आणि आपली वस्त्रे फाडू नका; तसे कराल तर मराल आणि सर्व मंडळीवर कोप भडकेल; पण त्याने जो अग्नी पेटवला त्याबद्दल तुमच्या बांधवांनी म्हणजे सगळ्या इस्राएल घराण्याने विलाप करावा.


आणि परमेश्वराच्या समोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.


मरी त्याच्यापुढे चालते, जळते इंगळ त्याच्या पायांजवळ निघतात.


कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाव थोर आहे, माझ्या नावाप्रीत्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळतात व निर्दोष बली अर्पण करतात; कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


पण लेव्यांनी आपले डेरे साक्षपटाच्या निवासमंडपासभोवती ठोकावेत म्हणजे इस्राएल लोकांच्या मंडळीवर कोप होणार नाही; आणि लेव्यांनी साक्षपटाच्या निवासमंडपाचे रक्षण करावे.”


ते मांस त्यांच्या तोंडात पडते न पडते, तोच परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व त्याने भयंकर पटकीने त्यांचा संहार केला.


पवित्रस्थानाचे व वेदीसंबंधीचे कर्तव्य तुम्हीच करावे म्हणजे इस्राएल लोकांवर पुन्हा कोप होणार नाही.


त्याच्यासाठी व त्याच्यामागून त्याच्या संततीसाठी हा निरंतरचा याजकपदाचा करार होय; कारण आपल्या देवाविषयी तो ईर्ष्यावान होऊन त्याने इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त केले.”


आणि तो त्या इस्राएल पुरुषाच्या पाठोपाठ डेर्‍याच्या आतील खोलीत शिरला आणि त्याने त्या उभयतांना, म्हणजे त्या इस्राएल पुरुषाला व त्या बाईला पोटात बरचीने आरपार भोसकले. त्यामुळे इस्राएल लोकांमध्ये पसरलेली मरी थांबली.


दर्शनमंडपात इस्राएल लोकांसाठी सेवा करायला व इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त करायला अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना इस्राएल लोकांतून लेवी दान म्हणून मी दिले आहेत; म्हणजे इस्राएल लोक पवित्रस्थानाजवळ आले असता त्यांच्यावर अनर्थ गुदरू नये.”


नंतर तबेरा, मस्सा व किब्रोथ-हत्तव्वा येथेही तुम्ही परमेश्वराला संतप्त करीत राहिलात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan