Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 16:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 ह्याचा हेतू असा की, अहरोन वंशाचा नसलेल्या कोणा परक्याने परमेश्वरासमोर धूप जाळण्यास जाऊ नये ह्याचे स्मरण इस्राएल लोकांना राहावे; आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे एलाजाराला सांगितल्याप्रमाणे कोरहाची व त्याच्या साथीदारांची झाली तशी गत कोणाचीही होऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा केली होती तसेच त्याने केले. अहरोनाच्या वंशातीलच कोणीतरी परमेश्वरासमोर धूप जाळू शकतो, दुसऱ्या कोणी परमेश्वरासमोर धूप जाळला तर तो कोरह आणि त्याच्या अनुयायांप्रमाणे मरेल. हे इस्राएल लोकांनी लक्षात ठेवायची ही एक खूण होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 कोरह आणि त्याचे सोबत्यांची जी दशा झाली, तशी वेदीपुढे अनाधिकृतपणे धूप जाळणार्‍या म्हणजे अहरोनाचा वंशज नसलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीची होऊ नये, याची आठवण इस्राएली लोकांना देण्याकरिता ते वेदीवरील आच्छादन होते. याप्रमाणे याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञा पाळण्यात आल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 16:40
16 Iomraidhean Croise  

ह्या सर्वांनी आपापल्या वंशावळींचा लेख ज्यांची वंशावळी नोंदली होती त्यांच्या वहीत शोधला पण त्यांना तो न मिळाल्यामुळे ते अशुद्ध ठरून याजकपदावरून भ्रष्ट झाले.


हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर भाव ठेव; तोच त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे.


आणि उत्तराभिमुख असलेली खोली वेदीचे रक्षण करणार्‍या याजकांसाठी आहे; ते सादोकाचे वंशज आहेत; ते लेवीच्या वंशातले असून परमेश्वरासमीप सेवा करण्यासाठी जातात.


माझी सेवा करण्यास माझ्यासमीप येणार्‍या लेवी वंशातला सादोकाच्या कुळातील याजक ह्याला पापार्पण करण्यासाठी तू एक गोर्‍हा दे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


कोणा परक्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत; याजकाचा पाहुणा किंवा मजूर ह्यानेही पवित्र पदार्थ खाऊ नयेत.


निवासमंडप पुढे न्यायचा असेल तेव्हा लेव्यांनीच तो मोडावा; आणि तो उभा करताना लेव्यांनीच तो उभा करावा; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.


जी पितळेची धुपाटणी अग्नीने भस्म झालेल्या त्या पुरुषांनी अर्पण केली होती, ती घेऊन एलाजार याजकाने त्यांचे पत्रे ठोकले व वेदी मढवली;


अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची नेमणूक कर म्हणजे ते आपले याजकपण सांभाळतील; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.”


निवासमंडपासमोर पूर्वेकडे म्हणजे दर्शनमंडपासमोर उगवतीस जे डेरे ठोकायचे ते मोशे आणि अहरोन व त्यांचे मुलगे ह्यांचे असावेत; इस्राएल लोकांकरिता पवित्रस्थानाच्या रक्षणाची जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली होती, ती त्यांनी पार पाडावी; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.


हा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो.


तेव्हा त्यांना तुम्ही सांगा की, यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभंगले; तो यार्देनेतून पलीकडे जात असताना तिच्या पाण्याचे दोन भाग झाले. अशा प्रकारे हे धोंडे इस्राएल लोकांसाठी कायमचे स्मारक होतील.”


त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांतिमार्गात बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan