गणना 16:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 पाप करून आपल्या जिवास जे मुकले त्यांची ती धुपाटणी घेऊन त्यांचे पत्रे ठोकून वेदी मढव, कारण त्यांनी ती परमेश्वराला समर्पण केल्यामुळे पवित्र आहेत; ह्या प्रकारे ती इस्राएल लोकांना ताकीद दिल्याची चिन्हे होतील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 लोकांनी माझ्याविरूद्ध पाप केले आणि त्यांच्या पापामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. पण धुपाटणी भांडी अजूनही पवित्र आहेत. ही भांडी पवित्र आहेत कारण ती परमेश्वरास अर्पण केली होती. भांडी ठोकून त्याचा पत्रा कर. या पत्र्याचा उपयोग वेदी झाकायला कर. इस्राएलाच्या सर्व लोकांस हा ताकीद दिल्याचा इशारा असेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 ज्या लोकांनी आपला जीव धोक्यात घालून पाप केले होते, त्या लोकांच्या धुपाटण्यांतील हा धूप विखरून टाकावा. नंतर वेदीला आच्छादन म्हणून त्या धुपाटण्याचे रुंद पत्रे तयार करावेत, कारण ती धुपाटणी याहवेहपुढे वापरली असल्यामुळे पवित्र आहेत. वेदीवरील हा पत्रा इस्राएली लोकांना या प्रसंगाचे चिन्ह म्हणून राहील.” Faic an caibideil |