Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 16:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 आणि पृथ्वीने आपले तोड उघडून ते, त्यांची कुटुंबे, कोरहाची सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता गिळून टाकली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 धरतीने जणू आपले तोंड उघडून त्यांना गिळून टाकले. कोरहाची सगळी माणसे, त्याचे संपूर्ण घराणे आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जमिनीत गेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 आणि कोरह व त्याचे तंबू त्यांची कुटुंबे आणि त्यांच्याजवळ उभे असलेले त्यांचे मित्र व त्यांच्या सर्व मालमत्तेसह पृथ्वीने गिळून टाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 16:32
21 Iomraidhean Croise  

तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे;


कहाथाची संतती : त्याचा पुत्र अम्मीनादाब, त्याचा पुत्र कोरह, त्याचा पुत्र अस्सीर,


बिन तहथ, बिन अस्सीर, बिन एब्यासाफ, बिन कोरह,


तेव्हा भूमी फाटली व तिने दाथानाला गिळून टाकले, आणि अबिरामाच्या टोळीस गडप केले;


जमीन नांगरताना व ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, तशी आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत.


हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत!


हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस.


हे परमेश्वरा, माझ्या उद्धारक देवा, मी रात्रंदिवस तुझ्यापुढे आरोळी करतो;


भूमी अगदी फाटून गेली आहे, भूमी साफ फुटून गेली आहे, भूमी अतिशय हादरून गेली आहे.


ह्यामुळे अधोलोकाने आपली क्षुधा वाढवली आहे, आपले तोंड अमर्याद पसरले आहे; त्यात त्यांचे वैभव, त्यांचे जमाव, त्यांचा थाटमाट, तेथले मौज मारणारे पडतील.


तुम्ही सर्व आपली धुपाटणी घेऊन त्यात धूप घाला; प्रत्येकी एक धुपाटणे ह्याप्रमाणे दोनशे पन्नास धुपाटणी परमेश्वरासमोर आणावीत; तू व अहरोन ह्यांनीही आपापले धुपाटणे आणावे.”


पण परमेश्वराने काही अद्भुत गोष्ट घडवली म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून ह्यांना व ह्यांच्या सर्वस्वाला गिळून टाकले आणि हे अधोलोकात जिवंत उतरले, तर असे समजा की, ह्या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानले आहे.”


हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्यांच्या पायांखालची भूमी दुभंगली.


ह्याप्रमाणे ते व त्यांचे सर्वस्व अधोलोकात जिवंत उतरले. पृथ्वीने त्यांना गडप केले आणि मंडळीतून ते नष्ट झाले.


कोरहाच्या प्रकरणात जे मेले त्यांच्याव्यतिरिक्त मरीने चौदा हजार सातशे ऐंशी लोक मेले.


ज्या वेळी ती अडीचशे पुरुषांची टोळी अग्नीत भस्म होऊन मरण पावली त्या वेळी पृथ्वीने आपले तोंड उघडून कोरहाबरोबर त्यांनाही गिळून टाकले, व ते चिन्हादाखल झाले.


तरीपण कोरहाचे मुलगे मेले नव्हते.


“आमचा बाप रानात मरण पावला; ज्या मंडळीने कोरहाच्या टोळीत सामील होऊन परमेश्वराला विरोध केला होता तिच्यात तो नव्हता तर तो आपल्याच पापाने मेला; त्याला मुलगे नव्हते.


“कहाथी कुळांच्या वंशाचा लेव्यांतून उच्छेद होऊ देऊ नये;


त्याचप्रमाणे त्याने रऊबेनी अलीयाबाचे मुलगे दाथान व अबीराम ह्यांचे काय केले, म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून त्यांची कुटुंबे, डेरे आणि त्यांचे अनुचर ह्यांसह त्यांना इस्राएल लोकांदेखत कसे गिळून टाकले, ह्या गोष्टी त्यांनी पाहिल्या नाहीत;


परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले; तिने ‘आपले तोंड उघडून’ अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी ‘गिळून टाकली.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan