Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 16:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 पण परमेश्वराने काही अद्भुत गोष्ट घडवली म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून ह्यांना व ह्यांच्या सर्वस्वाला गिळून टाकले आणि हे अधोलोकात जिवंत उतरले, तर असे समजा की, ह्या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 पण जर परमेश्वराने या लोकांस वेगळ्या नव्या रीतीने मारले. तर तुम्हास कळेल की त्यांनी परमेश्वराविरूद्ध पाप केले होते. हा पुरावा आहे. धरती दुभागेल आणि त्या लोकांस आपल्या पोटात घेईल. ते जिवंतपणीच त्यांच्या कबरेत जातील. आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जाईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 परंतु याहवेहने चमत्कार केला आणि या भूमीने आपले तोंड उघडून या लोकांना त्यांच्या सर्व मालमत्तेसह जिवंतपणे अधोलोकात गिळून टाकले, तर या लोकांनी याहवेहला तुच्छ मानले आहे, हे तुम्हाला समजून येईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 16:30
12 Iomraidhean Croise  

वरून देवाकडून काय वाट्यास येणार? ऊर्ध्वलोकाहून कोणते वतन सर्वसमर्थ भोगायला लावणार?


दुष्टाला विपत्ती व दुष्कर्म्याला अनर्थ प्राप्त होत नाही काय?


तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला त्या वेळी त्यांनी आम्हांला जिवंत गिळून टाकले असते;


त्यांना अकस्मात मरण येवो; ते जिवंतच अधोलोकी उतरोत; त्यांच्या घरात व अंतर्यामात दुष्टाई आहे.


परमेश्वर आपले कार्य, आपले अपूर्व कार्य करण्यास, आपली कृती, आपली विलक्षण कृती सिद्धीस नेण्यास परासीम डोंगरावर उठल्याप्रमाणे उठेल, गिबोन खोर्‍यातल्याप्रमाणे क्षुब्ध होईल.


पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आत्ताच ती उद्भवत आहे; तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन.


मीच पृथ्वी केली व तिच्यावर माणसे उत्पन्न केली, मी म्हणजे माझ्या हातांनी आकाश पसरले; मी आकाशसेनेस आज्ञा दिली.


प्रकाशकर्ता, अंधाराचा उत्पन्नकर्ता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे; हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे.


हे मला सोडून जाणार्‍या कन्ये, तू कोठवर इकडेतिकडे भटकशील? परमेश्वराने तर पृथ्वीवर अजब प्रकार केला आहे; स्त्री पुरुषाच्या मागे लागेल.”


पाण्यानजीक लावलेल्या कोणत्याही वृक्षाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये; आपल्या शेंड्याने मेघमंडळास भेदू नये, पाण्याने पोसलेल्या वृक्षाने आपल्या उंचीमुळे स्वतःवर भिस्त ठेवू नये म्हणून हे घडून आले आहे; कारण त्या सर्वांना मृत्यूच्या, अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे; ज्या गर्तेत मानवपुत्र जातात तिच्यात त्यांनाही जायला लावले आहे.


हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्यांच्या पायांखालची भूमी दुभंगली.


ह्याप्रमाणे ते व त्यांचे सर्वस्व अधोलोकात जिवंत उतरले. पृथ्वीने त्यांना गडप केले आणि मंडळीतून ते नष्ट झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan