Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 16:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, “हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 पण मोशे आणि अहरोन जमिनीवर पालथे पडले आणि ओरडले, हे देवा सर्व देहधारी आत्म्यांच्या, देवा! फक्त एका मनुष्याने पाप केले आहे! म्हणून सर्व मंडळीवर रागावू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 पण मोशे आणि अहरोन याहवेहपुढे जमिनीवर पालथे पडले व विनंती करून म्हणाले “हे परमेश्वरा, सर्व जीवधार्‍यांना जीवनाचा श्वास प्रदान करणाऱ्या परमेश्वरा, एकाच मनुष्याने पाप केले तरी तुम्ही सर्व लोकांवर रागावणार काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 16:22
24 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “प्रभूला राग न यावा; मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित दहाच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या दहांकरता त्याचा नाश करणार नाही.”


परमेश्वराचा कोप इस्राएलावर पुनरपि झाला, आणि इस्राएल व यहूदा ह्यांची गणती करण्याची प्रेरणा देवाने त्यांच्याविरुद्ध दाविदाला केली.


लोकांचा नाश करणारा देवदूत दाविदाच्या दृष्टीस पडला तेव्हा त्याने परमेश्वराला म्हटले, “पाहा, मी पाप केले, मी दुर्मार्गानेही चाललो, पण ह्या मेंढरांनी काय केले? तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडावा.”


त्याच्याच हाती सर्व प्राण्यांचा जीव, सर्व मानवजातीचा प्राण आहे.


त्याच्या याजकांपैकी मोशे व अहरोन, आणि त्याच्या नावाचा धावा करणार्‍यांपैकी शमुवेल, ह्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले.


तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल.


कारण मी सतत वाद करणारा नव्हे, सदा कोप करणारा नव्हे; असतो तर माझ्यापुढे मानवी आत्मा, मी उत्पन्न केलेले मानवप्राणी गलित झाले असते.


“पाहा, मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे; मला अवघड असे काही आहे काय?


सिद्कीयाने गुप्तपणे यिर्मयाला प्रतिज्ञापूर्वक म्हटले, “आमचा जीव ज्याने उत्पन्न केला त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी तुला जिवे मारणार नाही व तुझा प्राण घेऊ पाहणार्‍या ह्या लोकांच्या हाती तुला देणार नाही.”


पाहा, सर्व जीव माझे आहेत, बापाचा जीव तसा पुत्राचा जीवही माझा आहे, जो जीवात्मा पाप करतो तो मरेल.


मोशेने अहरोन आणि त्याचे मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की, “तुम्ही आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नका आणि आपली वस्त्रे फाडू नका; तसे कराल तर मराल आणि सर्व मंडळीवर कोप भडकेल; पण त्याने जो अग्नी पेटवला त्याबद्दल तुमच्या बांधवांनी म्हणजे सगळ्या इस्राएल घराण्याने विलाप करावा.


म्हणजे लोकांवर दोष येईल अशा प्रकारचे पाप जर अभिषिक्त याजकाने केले तर त्याने आपल्या पातकाबद्दल पापबली म्हणून एक दोषहीन गोर्‍हा परमेश्वराला अर्पावा.


इस्राएलाविषयी परमेश्वराची वाणी : आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा व मनुष्याच्या अंतर्यामी आत्मा निर्माण करणारा परमेश्वर म्हणतो :


तेव्हा मोशे व अहरोन तेथे जमलेल्या इस्राएलाच्या सर्व मंडळीसमोर पालथे पडले,


मग परमेश्वर मोशेला म्हणाला,


हे ऐकून मोशे पालथा पडला;


“तुम्ही ह्या मंडळीपासून दूर व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांचा नाश करतो.” हे ऐकून ते पालथे पडले.


“सर्व देहधारी आत्म्यांचा देव जो परमेश्वर त्याने ह्या मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावी;


तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते.


ती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.


शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरत असू; तर आपण विशेषेकरून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय?


हे काय थोडे झाले म्हणून तुम्ही आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देत आहात? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले तर उद्या इस्राएलाच्या सर्व मंडळीवर त्याचा क्रोध भडकेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan