Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 16:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 शिवाय, दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या देशात तू आम्हांला मुळीच आणलेले नाहीस अथवा शेते व द्राक्षमळे ह्यांचे वतन आम्हांला दिलेले नाहीस. ह्या लोकांच्या डोळ्यांत तू धूळ फेकतोस काय? आम्ही येत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आणखी तू आम्हास दूध व मध वाहण्याच्या देशात आणले नाही आणि आम्हास शेताचे व द्राक्षमळ्याचे वतन दिले नाही. आता तू पोकळ वचने देऊन आमचे डोळे आंधळे करीत आहेस काय? आम्ही तुझ्याकडे येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्या शिवाय, तू आम्हाला दूध व मध वाहणार्‍या देशात आणले नाहीस किंवा आम्हाला शेतीचे व द्राक्षमळ्यांचे वतन दिले नाहीस. या पुरुषांना तू गुलाम समजतोस काय? नाही, आम्ही येणार नाही!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 16:14
12 Iomraidhean Croise  

कोणी दुसर्‍याचे शेत अथवा द्राक्षमळा खाववला, म्हणजे आपले जनावर मोकळे सोडले, आणि त्याने दुसर्‍याचे शेत खाल्ले, तर आपल्या शेतातील आणि आपल्या द्राक्षमळ्यातील उत्तमोत्तम उपज देऊन त्याचे नुकसान त्याने भरून द्यावे.


सहा वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर, आणि तिचे उत्पन्न साठव.


पण सातव्या वर्षी ती पडीत राहू दे, म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील ते तीत उगवलेले खातील; त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशू खातील. तुझे द्राक्षमळे व जैतुनवने ह्यांविषयीही तसेच कर.


मिसर देशातल्या विपत्तीतून सोडवून कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात, तुम्हांला घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळव.


त्यांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.


त्यांचा देश तुमचे वतन होईल, ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश तुमच्या ताब्यात देईन, असे मी तुम्हांला सांगितले आहे. तुम्हांला इतर राष्ट्रांपासून वेगळे करणारा मी परमेश्वर तुमचा देव आहे.


ते मोशेला म्हणाले की, “ज्या देशात तू आम्हांला पाठवले त्या देशात आम्ही गेलो; त्यात खरोखरच दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत; तेथली ही फळे पाहा.


परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या देशात आम्हांला नेईल आणि तो देश आम्हांला देईल.


मिसर देश सोडायला लावून आम्हांला ह्या भिकार ठिकाणी का आणले? येथे धान्य, अंजीर, द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच, पण प्यायला पाणीसुद्धा नाही.”


पलिष्ट्यांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन काशाच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळायला लावले.


नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला, “मी तुम्हा सर्वांचा उजवा डोळा फोडून अवघ्या इस्राएलाची अप्रतिष्ठा करीन, ह्या अटीवर मी तुमच्याशी करार करीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan